आज दिवसभरात... (ई सकाळ न्यूज बुलेटिन)

WhatsApp_Bulletin
WhatsApp_Bulletin

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या 

राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला
प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वादामध्ये आणखी तेल ओतले. राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने पुन्हा हा वाद चिघळला आहे.

आता इंटरनेटसाठीही 'आधार' आवश्यक
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड सध्या बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर आता इंटरनेट वापरासाठीही आधारकार्ड आवश्यक करण्यात आले आहे. ज्या इंटरनेट ग्राहकांकडे आधारकार्ड क्रमांक नसेल, अशा ग्राहकांची इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद ते मुंबई एकतेचा इतिहास; 'कोपर्डी'नंतर एकवटला मराठा समाज 
कोपर्डी येथील घटनेनंतर औरंगाबादेतून 9 ऑगस्ट 2016 या क्रांतिदिनी काढलेल्या ऐतिहासिक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मराठा समाज एकवटला. मोर्चाची शिस्त, आचारसंहिता पाळत एकापाठोपाठ एक राज्य, देशपातळीवर भव्य मोर्चे निघाले. यानंतरच सरकारला कोपर्डीचे भयाण वास्तव स्वीकारावे लागले.

आरक्षित तिकिट असूनही पोलिसांनी रेल्वेतून उतरविले
झारखंड येथे मूळ रहिवासी असलेला युवक पुणे रेल्वे स्थानकावरून बुधवारी सकाळी दुरांतो एक्सप्रेसने भावी वधूला पाहण्यासाठी निघाला. आरक्षण तिकिट असल्यामुळे तो आपल्या बर्थवर मोबाईलमधील गाणी ऐकत होता. त्याचवेळी रेल्वेचे पोलिसांनी त्याला तुझ्या मोबाईलमध्ये अश्‍लिल चित्रफित असल्याचे सांगून त्याच्याकडून पंधरा हजार रुपयांची मागणी केली. त्याने नकार देतातच चिडलेल्या पोलिसांनी त्याच्या खिशातील तीन हजार रुपये घेऊन त्याला गाडीतून खाली उतरविले. 

अबब! पोटातून निघाला चक्क स्टीलचा ग्लास 
शस्त्रक्रिया करुन विविध आजार बरे झाल्याचे आपण आत्तापर्यंत अनुभवले असलेच. मात्र, आता एका व्यक्तीची पोटाची शस्त्रक्रिया केली असता यादरम्यान चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे डॉक्टरांसह नातेवाईकांना धक्काच बसला आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे ही घटना घडली.

माजलगावात रास्ता रोको आंदोलन
ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक असून ऊसाला भाव द्यावा, या मागणीसाठी शहरातील शिवाजी चौकात आज ता. 30 गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

कोपर्डी प्रकरणातील नराधम येरवडा मध्यवर्ती कारागृहात
कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील गुन्हेगारांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार जितेंद्र शिंदे सहगुन्हेगार संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे यांना फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवतात अशा स्वंतत्र खोल्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. 

उत्तर भारतीयांमुळे महाराष्ट्राच्या वैभवात भर: मुख्यमंत्री
मराठी संस्कृतीशी एकरूप होऊन उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राच्या वैभवात भरच घातली आहे. त्यामध्ये आय. डी. सिंह यांच्या सारख्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काढले. घाटकोपर येथील स्टेशन रोडवरील चौकाचे मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी आय. डी. सिंह असे नामकरण करण्यात आले.

टाकावू प्लॅस्टिकपासून इंधन, हॅंडबॅग्ज अन्‌ चपलाही
निसर्ग अनादी काळापासून मानवाचा मित्र राहिला; परंतु आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे हा मित्र आपण गमावण्याच्या मार्गावर आहोत. ज्या अनेक कारणांमुळे आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आहोत, त्यापैकी एक आहे प्लॅस्टिकचा अतिवापर. या अतिवापराचे दुष्परिणाम गेल्या दोन दिवसांत "सकाळ'ने मांडले. उगवत्या पिढ्यांचे भविष्य प्रदूषणापासून सुरक्षित करू पाहणाऱ्या काही प्रयोगांची दखल आजच्या अंकात.

सलमान मानुषीला बॉलिवूडमध्ये आणणार..?
बॉलिवूडमध्ये सध्या विश्वसुंदरी मानुषी चिल्लरची चांगलीच हवा आहे. ती चित्रपट क्षेत्रात येणार का असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यातच आता अभिनेता सलमान खान मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहे अशी देखील चर्चा आहे. 

पंतप्रधान मोदी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते : राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही उत्तम अभिनेते आहेत. रडताना त्यांना कोणत्याही कॉन्टॅक्ट लेन्सेसची गरज नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्यावरूनही सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

‘स्पॉट व्हिजिट’वर वेशांतर करून गेलो - शशिराज पाटोळे
कोपर्डीतील लहान मुलगीवर बलात्कार करून खून झालेल्या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे ‘सकाळ’शी बोलत होते. तपास करून ज्यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले ते या सर्व घटनेत प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते.

शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व कमी करण्याचा भाजपचा डाव - जयंत पाटील
शालेय पाठ्य पुस्तकातून मोंगलाचा इतिहास काढून टाकून शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व कमी करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असा सणसणीत आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला.

शिक्षकांनी 88 विद्यार्थिनींना दिली कपडे काढण्याची शिक्षा
येथील एका शाळेत मुख्याध्यापकांबद्दल अश्लिल शब्दांचे लेखन केल्याने शाळेतील तीन शिक्षकांनी 88 विद्यार्थिनींना कपडे काढण्याची शिक्षा दिल्याचे समोर आले आहे. 
http://www.esakal.com/desh/88-girl-students-allegedly-forced-undress-teachers-punishment-84954

खांबाटकी बोगद्याजवळ चार वाहनांचा अपघात; 13 जखमी 
सातारा-पुणे महामार्गावर खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतर लक्झरी बसला पाठीमागुन भरधाव येणाऱ्या दूध टँकरने जोरदार धडक दिल्याने बस पुढील ट्रकवर आदळली . हा ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला .

अश्‍लील संदेश पाठविणाऱ्यास चोप
नातेवाइकाच्या मोबाईल दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेलेल्या मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर अश्‍लील मेसेज करणाऱ्या परप्रांतीय युवकाला स्थानिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. तो युवक आपल्या नातेवाइकाच्या सुपर मार्केटमध्ये कामाला आहे. दरम्यान, मोबाईल दुकानचालकाला स्थानिकांनी पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन त्यालाही पोलिस ठाण्याबाहेरच चोप देऊन हात साफ करून घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com