आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)

टींम ई सकाळ
सोमवार, 26 जून 2017

राज्यभरात घडलेल्या विविध घडामोडींचा व्हिडिओजच्या माध्यमातून घेतलेला आढावा 

दिवसभरातील राज्यातील विविध घडामोडी संबंधीत व्हिडिओ बुलेटिन...

पंढरपुर- आषाढी एकादशी पूर्वीच पंढरपुरमध्ये भाविकांची गर्दी..

लोणावळा - लोणावळा परिसरात पावसाला सुरवात झाली असून, पर्यटकांना नेहमीच खुणावत असलेले भुशी धरण भरले आहे. त्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे.

बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवाचा तिसरा दिवस..
आज महिलांसाठी विशेष लावणी महोत्सव.. आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती...

कोल्हापूर: धरण क्षेत्रात रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा सोमवारी सकाळी पाण्याखाली गेला (व्हिडिओ: नितीन जाधव)

नांदेड अर्धापूर जिल्हा नांदेड येथे ईद उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून शुभेच्छा देण्यात आल्या.

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे कुंडलिका नदीवरील धबधब्यात भिजण्याचा आनंद घ्यायला भिरा खेड्यात गेलेली 55 मुले-मुली धबधब्याचं पाणी अचानक वाढल्यानं अडकली.
रायगड पोलिसांनी त्यांना दोराच्या साह्यानं बाहेर काढलं.या भागात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे.अशा पावसात ओढे, नाले, नदीचं पाणी अचानक वाढू शकतं. धबधब्यांतून लोंढे कोसळू शकतात...तेव्हा सावधान...

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहऴा बेलवाडीत उत्साहात पार पडला.
ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत वारकऱ्यांनी उत्साहात त्यात सहभाग घेतला (व्हिडीओ-सचिन शिंदे)

 

Web Title: sakal news maharashtra news video bulletin