‘सकाळ’च्या वाचकसंख्येत १७.७ टक्‍क्‍यांची भरघोस वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) ताज्या अहवालात ‘सकाळ’ने सरासरी वाचकसंख्येत (ॲव्हरेज इश्‍यू रीडरशिप- एआयआर) तब्बल १७.७ टक्के वाढ नोंदविली आहे. ‘सकाळ’ची एकूण वाचकसंख्या १ कोटी २९ लाखांवर पोचली आहे. पुणे जिल्ह्यात ‘सकाळ’ने ३९.४८ लाख एकूण वाचकसंख्येसह निर्विवाद अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ‘सकाळ’ची सरासरी वाचकांच्या संख्येतील वाढ १६.७ टक्के झाली आहे.

पुण्यात ‘सकाळ’ निर्विवाद नंबर वन; ‘आयआरएस’चा सर्वेक्षण अहवाल
पुणे - इंडियन रीडरशिप सर्व्हेच्या (आयआरएस) ताज्या अहवालात ‘सकाळ’ने सरासरी वाचकसंख्येत (ॲव्हरेज इश्‍यू रीडरशिप- एआयआर) तब्बल १७.७ टक्के वाढ नोंदविली आहे. ‘सकाळ’ची एकूण वाचकसंख्या १ कोटी २९ लाखांवर पोचली आहे. पुणे जिल्ह्यात ‘सकाळ’ने ३९.४८ लाख एकूण वाचकसंख्येसह निर्विवाद अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये ‘सकाळ’ची सरासरी वाचकांच्या संख्येतील वाढ १६.७ टक्के झाली आहे. ‘आयआरएस’मध्ये पुणे जिल्हा क्षेत्रात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांसह जिल्ह्याचा समावेश होतो.

यापूर्वी एप्रिल २०१९ मध्ये जाहीर झालेल्या ऑडिट ब्यूरो सर्क्‍युलेशनच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील मराठी दैनिकांच्या खपात सकाळ पहिल्या स्थानावर असून, ‘सकाळ’चा खप १२ लाख ९२ हजार इतका नोंदवला होता. 

‘सकाळ’च्या सरासरी वाचकांमधील महिलांची संख्या १२ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सामाजिक-आर्थिक दर्जानुसार होणाऱ्या वर्गवारीमध्ये (National Consumer Classification System - NCCS) अती उच्च दर्जाच्या एनसीसीएस-ए श्रेणीत ‘सकाळ’ने सरासरी वाचकांच्या संख्येत २१.५ टक्के वाढ नोंदविली आहे. या श्रेणीतील एकूण वाचकसंख्या ४८.३४ लाखांवर पोचली आहे. कोणतीही सेवा अथवा उत्पादने यांच्या जाहिरातींसाठी वाचकांची सामाजिक-आर्थिक वर्गवारी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. ‘सकाळ’च्या सरासरी वाचकांच्या एकूण संख्येपैकी पन्नास टक्के वाचक अती उच्च दर्जाचे किंवा एनसीसीएस-ए या श्रेणीतील आहेत. पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण झालेले २९.४४ लाख एकूण वाचक ‘सकाळ’ वाचतात, असे ताज्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. सरासरी वाचकांच्या संख्येतील वाढ १५.३ टक्के आहे. याचाच अर्थ उच्चशिक्षित वर्गामध्ये ‘सकाळ’ लोकप्रिय आहे. 

पुणे जिल्ह्यामध्ये ‘सकाळ’ची वाढ १६.७ टक्के झाली आहे. एनसीसीए-ए या श्रेणीतील वाचकांची पुणे जिल्ह्यातील संख्या तब्बल २६ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील वाचकांपैकी ६२.५ टक्के या श्रेणीतील वाचक आहेत. पुणे जिल्ह्यातील महिला वाचकांची संख्याही २६.४ टक्‍क्‍यांनी वाढली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Newspaper Reader Increase