सकाळ वाचक महोत्सव सुरू

Sakal-Reader-Mahotsav
Sakal-Reader-Mahotsav

पुणे - वाचकांना विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देणारा ‘सकाळ वाचक महोत्सव -  २०१९’ नुकताच  सुरू झाला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व शहरी वाचकांबरोबरच राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांपर्यंत आशयगर्भ पुस्तके पोचविण्याच्या उद्देशाने सकाळ प्रकाशनातर्फे दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांच्यासमोरील वैज्ञानिक आदर्शांचे वर्णन करणारे ‘मी शास्त्रज्ञ कसा झालो?’ आणि ‘नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान’ आणि  डॉ. एपीजे अब्दुल कलाम लिखित ‘माझ्या डायरीतील पाने’ ही प्रेरणादायी पुस्तके,  संत साहित्याचे अभ्यासक व तत्त्वचिंतक डॉ. सदानंद मोरे लिखित महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यजीवनाचा वेध घेणारे ‘विद्रोहाचे व्याकरण,’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले संग्रहित ग्रामीण म्हणींचा सार्थ संग्रह ‘लोपलेल्या सुवर्णमुद्रा - भाग  १ ते ३ ’, मंगला गोडबोले लिखित ‘धोक्‍यात हरवली वाट’ आणि ‘आरशांत डोकावून पाहताना’ अशी वैचारिक ललित स्वरूपाची पुस्तके, ऐश्वर्य पाटेकर यांचे अनेक पुरस्कार प्राप्त आत्मकथन ‘जू’, प्रतापराव पवार यांच्या कार्यजीवनाचा वेध घेणारे वाटचाल भाग १ व २, किशोरवयीन मुलांना व्यक्तिमत्त्व विकासाचा मंत्र देणारे ‘घडवा स्वतःला’ हे शिवराज गोर्ले लिखित पुस्तक, डॉ. शैलेंद्र गायकवाड लिखित स्वयंविकास, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ विष्णू मनोहर लिखित बिर्याणी पुलाव, भारतीय करीचे रहस्य आणि खाऊचा डबा ही पुस्तके, अशा तब्बल ४०० हून वैविध्यपूर्ण पुस्तके असतील. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन करणारी पुस्तकांचाही यात समावेश असेल.

महोत्सव कालावधीत सकाळ प्रकाशनची पुस्तके सकाळ मुख्य कार्यालय, आवृत्ती कार्यालये व वाचक महोत्सवात सहभागी राज्यातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे २५ टक्के सवलतीत मिळतील. वाचनालये, शाळा, महाविद्यालये व खासगी संस्थांना एकगठ्ठा पुस्तक खरेदीवर आकर्षक सवलत मिळेल.

सकाळ कार्यालयात, पुस्तक विक्रेत्यांकडे आणि www.sakalpublications.com वर प्रकाशनाची पुस्तक सूची उपलब्ध आहे. 

यानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी ‘लेखक वाचक संवाद’ कार्यक्रमही घडवले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे येथे किंवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा आणि ऑनलाइन खरेदीसाठी www.sakalpublications.com  / amazon.in  वर लॉग इन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com