माहितीचा खजिना एका 'क्‍लिक'वर

editorial
editorial

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला कोणती पुस्तके संदर्भासाठी वापरायची यापासून ते कोचिंग, अभ्यासिका उपलब्ध होणे आदी अनेक समस्या असतात. अशा परिस्थितीत त्याला त्याच्या सोयीच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास संबंधितांच्या वेळेत आणि खर्चातही बचत होते. एका "क्‍लिक'वर माहितीचा खजिना मिळाल्यास विद्यार्थ्याला अभ्यास करणे सोईचे जाईल. 

स्पर्धा परीक्षेत सध्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी उपलब्ध सुविधा म्हणजे पुस्तके, अभ्यासिका आणि शहरी भागातील कोचिंग क्‍लासेस अशी आहे. अर्थात, पुस्तकांद्वारे अभ्यास करताना काही अडचणी उभ्या राहतात. सर्वसमावेशकता असावी यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या 4 ते 5 प्रकाशनांची पुस्तके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या पुस्तकांमधून अभ्यास करणे जिकिरीचे होते. या पुस्तकांमधूनच स्वतःच्या नोट्‌स काढणे गरजेचे असते. सर्व पुस्तके वाचून त्यांच्या विषयवार नोट्‌स काढणे हे अत्यंत वेळखाऊ काम असते. नोट्‌स काढण्यामध्ये सातत्य टिकविणे गरजेचे असते. सातत्य टिकविता न आल्यास यशस्वी होण्याचाही कालावधी वाढत जातो. 

अभ्यासिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेकदा राहण्याच्या जागेजवळ अभ्यासिका उपलब्ध नसतात. अभ्यासिकेमध्ये आवश्‍यक सोयी उपलब्ध नसतात. अभ्यासिकेमध्ये जाण्या-येण्यासाठीचा वेगळा वेळ व पैसा खर्च होतो. कोचिंग क्‍लासेसच्या बाबतीत ग्रामीण भागात उपलब्धता नाही आणि सर्वच क्‍लासमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे जमत नाही. विद्यार्थ्यांना गावापासून दूर राहावे लागते. साहजिकच त्याचा आर्थिक व मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येतो. या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. सद्य परिस्थितीत फक्त मोठ्या शहरातच चांगले क्‍लासेस आहेत. त्यातच अनेकदा क्षमता असूनही आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याला क्‍लासला जाणे शक्‍य होत नाही. 

यावर उपाय आहे नामी! 
वरील सर्व अडचणींवर उपाय असणारी यंत्रणा विद्यार्थ्यांना गावात, घरात, खिशामध्ये उपलब्ध मिळायला हवी. विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी यंत्रणा उपलब्ध व्हावी व विद्यार्थ्याला कुठेही वापर करता येईल, अशी यंत्रणा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आता अशी यंत्रणा मोबाईल, टॅब, लॅपटॉप, तसेच संगणकाद्वारे उपलब्ध करणे आजच्या काळात शक्‍य आहे. सर्व शाळा, महाविद्यालयांमधून स्पर्धा परीक्षेपासून अगदी इंजिनिअरिंग, वैद्यकीय या क्षेत्रांसाठीही जागतिक स्तरावर नवीन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती वेगाने तयार होत आहे. अशा प्रकारची शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांसाठी सोयीची असल्यामुळे अशी यंत्रणा स्पर्धा परीक्षेसाठी असावी असे, बहुसंख्य विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावरच लक्षात आले. त्यातूनच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी शिवनेरी फाउंडेशनने हमखास यशासाठी यंत्रणा तयार केली. गेल्या काही दिवसांत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी याची विचारणा केली, अगदी माफक साडेबारा हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

गुणवत्तेमध्ये वाढ 
विद्यार्थ्यांमधील उपजत गुण, कौशल्य, त्यांची समजावून घेण्याची कुवत लक्षात घेऊन या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी आवश्‍यक असणारा नेमका अभ्यासक्रम व त्याची व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांसमोर येणार असून यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची नेमकी पद्धत लक्षात येणार आहे. संबंधित लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना पुनःपुन्हा अभ्यासता येतील. हव्या त्या वेळेला संबंधित अभ्यासक्रम पुनःपुन्हा समजावून घेता येईल. महत्त्वाची संकल्पना नीट अभ्यासून घेता येईल. मनामध्ये असणारी प्रत्येक शंका पुनःपुन्हा अभ्यासता येईल आणि अभ्यासक्रमाला योग्य दिशा मिळेल. एखाद्या वर्गात गेल्यानंतर बऱ्याचदा अभ्यासक्रमांमधील काही घटक अगदी थोडक्‍यात समजावून सांगितले जातात व उरलेला सखोल अभ्यास विद्यार्थ्याला स्वतःच विविध पुस्तकांमधून करावा लागतो. मात्र, या व्हिडिओ लेक्‍चर्समध्ये सर्व घटक सखोल पद्धतीने समजावून सांगण्यात आलेले आहेत. हे घटक विद्यार्थ्याला अगदी मुळापासून सखोल पद्धतीने समजावून घेता येतील व अभ्यासाची व्याप्ती वाढेल. कधीकधी वर्गात आजारपण किंवा इतर कारणांमुळे हजर राहता आले नाही, तर अभ्यासक्रम अपूर्ण राहतो, ही स्थिती यामध्ये उरणार नाही. 

खर्चात बचत 
स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप खर्च येतो असे म्हटले जाते. अगदी लाख रुपयांपर्यंत खर्च येतो असेही विद्यार्थी सांगतात. मात्र, या खर्चाची तुलना केल्यास अगदी दहा टक्‍क्‍यांच्या खर्चातच स्पर्धा परीक्षेचा गुणात्मक व दर्जेदार अभ्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह उपलब्ध होणार आहे. शिवाय, पुढील दीड वर्ष त्या विद्यार्थ्यास चालू घडामोडींची स्वतंत्र माहिती मिळेल आणि हव्या त्या शहरामध्ये, गावामध्ये राहून आपणास तयारी करता येईल. एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणत्याही विषयामधील एखादा प्रश्‍न येत नसेल, अशा विद्यार्थ्याला तो प्रश्‍न व्हॉट्‌सऍप तसेच ई-मेलवर पाठविल्यास त्याचे उत्तर 24 तासांच्या आत स्पष्टीकरणासह पाठविले जाईल. 

कोणत्या सुविधा मिळणार? 

  • राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 1 व पेपर 2 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमांमधील सर्व घटकांचे व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. या व्हिडिओ लेक्‍चर्समध्ये प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटक त्या विषयामधील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शिकविण्यात आला आहे. 
  • विद्यार्थ्यांना दोनशे तासांचा अभ्यासक्रम पेनड्राइव्ह तसेच मेमरी कार्डमध्ये उपलब्ध. 
  • विषयाचा अभ्यास कसा करायचा येथपासून ते परीक्षेमध्ये प्रश्‍न कसे विचारले जातात, ते कसे सोडवायचे, आपण नेमके कोठे चुकतो याचेही व्याख्यानातून मार्गदर्शन. 
  • अभ्यासामधील अद्ययावत घटना विद्यार्थ्यांना पुढील 18 महिने त्यांच्या व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात नियमितपणे पाठविण्यात येणार. यामुळे विद्यार्थ्यांना सद्य घटनांसाठी वेगळा वेळ देण्याची आवश्‍यकता भासणार नाही. 
  • विद्यार्थ्यांना आपली सर्व तयारी एकाच ठिकाणी करता येणार आहे. अद्ययावत घटना व्हिडिओ लेक्‍चर आणि पीडीएफ स्वरूपात उपलब्ध. 
  • या अभ्यास पद्धतीमुळे विद्यार्थ्याला संबंधित विषयामधील सर्व संकल्पना समजावून घेता येणार आहेत. 
  • विद्यार्थ्याला वर्षामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सराव पेपर व उत्तरपत्रिका परीक्षेअगोदर सरावासाठी पाठविण्यात येतील. 
  • विद्यार्थ्याला आवश्‍यक असल्यास या प्रश्‍नपत्रिकांचे मूल्यमापन करून मिळणार. 
  • प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याच्याजवळ किमान अँड्राईड मोबाईल आहे, त्याला या सर्व सुविधा घेता येणार. 
  • पेपरमधील प्रत्येक घटकाचे नियोजन कसे करावे येथपासून ते परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडविण्याची पद्धत याचे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात येणार. 

रोजंदारी करणारा झाला अधिकारी 
घरची हलाखीची परिस्थिती, वडील रोजंदारीवर आणि आई घरोघरी घरकाम करून कुटुंबाची कशीतरी गुजराण सुरू होती, त्यातच वडिलांचे छत्र हरपल्याने मोठा प्रश्‍न निर्माण झाला. शिक्षण घेत असतानाच रोजंदारीची कामे करणारा आणि वर्ग एकचा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणारा तरुण दत्तात्रेय भिसे हे सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाले आहेत. 

माळेगाव (ता. शेवगाव) येथील भिसे कुटुंबीय दररोजच्या मिळकतीवर उदरनिर्वाह करत. भिसे यांचे वडील सुखदेव यांनी नगरकडे धाव घेतली. एका हॉटेलमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून, तर आई संजीवनी घरकाम करू लागल्या. दहा बाय दहाच्या पत्र्याच्या खोलीत त्यांचा संसार चाले. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण दत्तात्रेय यांनी शेवगावला चुलते सर्जेराव यांच्याकडे राहत जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. वडिलांच्या आकस्मिक निधनाने ते नगरला आले. येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. याकाळात सुटीच्या दिवशी ते नर्सरीतील झाडे विकणे, बांधकामावर कामगार म्हणून जाणे अशी कामे करत. दहावीला 80 टक्के, तर बारावीला विज्ञान शाखेतही चांगले गुण मिळाले. पैसे नसल्याने अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाकडे जाता आले नाही. म्हणून त्यांनी "डीएड'चा मार्ग निवडला. थोरल्या भावाचे हे शिक्षण विनाअडथळा पूर्ण व्हावे म्हणून त्यांचा लहान भाऊदेखील वेगवेगळी कामे करून हातभार लावत होता. दूरगाडी (ता. भोर) येथे शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. डिसेंबर 2013मध्ये झालेल्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पहिली नियुक्ती नगरला मिळाली. वर्ग एकचा अधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी सहायक विक्रीकर आयुक्त पदासाठी परीक्षा दिल्या, त्यात अपयश आले. कुटुंबीय आणि कार्यालयातील सहकारी बाबूराव जाधव यांच्या प्रोत्साहनामुळे 2016मध्ये पुन्हा प्रयत्न केला. राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. भिसे "यशदा'मध्ये प्रशिक्षण घेत असून, वेळ मिळेल तसे ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com