राज्यसेवा पुर्व परिक्षेची तयारी कशी करावी?

गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे- येत्या 8 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परिक्षेच्या तयारीच्या उद्देशाने शिवनेरी फाउंडेशनच्या सुहास कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या परिक्षेची तयारी नेमकी कशी करावी यावर कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. 

राज्यसेवा पुर्व परिक्षेची तयारी कशी करावी? (व्हिडीओ)

पुणे- येत्या 8 एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पुर्व परिक्षेच्या तयारीच्या उद्देशाने शिवनेरी फाउंडेशनच्या सुहास कोकाटे यांनी विद्यार्थ्यांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या परिक्षेची तयारी नेमकी कशी करावी यावर कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. 

राज्यसेवा पुर्व परिक्षेची तयारी कशी करावी? (व्हिडीओ)

माहितीचा खजिना एका 'क्‍लिक'वर
स्पर्धा परीक्षेत सध्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी उपलब्ध सुविधा म्हणजे पुस्तके, अभ्यासिका आणि शहरी भागातील कोचिंग क्‍लासेस अशी आहे. अर्थात, पुस्तकांद्वारे अभ्यास करताना काही अडचणी उभ्या राहतात. सर्वसमावेशकता असावी यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या 4 ते 5 प्रकाशनांची पुस्तके घ्यावी लागतात. वेगवेगळ्या पुस्तकांमधून अभ्यास करणे जिकिरीचे होते. या पुस्तकांमधूनच स्वतःच्या नोट्‌स काढणे गरजेचे असते. सर्व पुस्तके वाचून त्यांच्या विषयवार नोट्‌स काढणे हे अत्यंत वेळखाऊ काम असते. नोट्‌स काढण्यामध्ये सातत्य टिकविणे गरजेचे असते. सातत्य टिकविता न आल्यास यशस्वी होण्याचाही कालावधी वाढत जातो.

अभ्यासिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनेकदा राहण्याच्या जागेजवळ अभ्यासिका उपलब्ध नसतात. अभ्यासिकेमध्ये आवश्‍यक सोयी उपलब्ध नसतात. अभ्यासिकेमध्ये जाण्या-येण्यासाठीचा वेगळा वेळ व पैसा खर्च होतो. कोचिंग क्‍लासेसच्या बाबतीत ग्रामीण भागात उपलब्धता नाही आणि सर्वच क्‍लासमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थित राहणे जमत नाही. विद्यार्थ्यांना गावापासून दूर राहावे लागते. साहजिकच त्याचा आर्थिक व मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येतो. या सर्वांचा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर परिणाम होतो. सद्य परिस्थितीत फक्त मोठ्या शहरातच चांगले क्‍लासेस आहेत. त्यातच अनेकदा क्षमता असूनही आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याला क्‍लासला जाणे शक्‍य होत नाही.​

यावर उपाय आहे नामी! 
वरील सर्व अडचणींवर उपाय असणारी यंत्रणा विद्यार्थ्यांना गावात, घरात, खिशामध्ये उपलब्ध मिळायला हवी. विद्यार्थ्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी यंत्रणा उपलब्ध व्हावी व विद्यार्थ्याला कुठेही वापर करता येईल, अशी यंत्रणा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आता अशी यंत्रणा मोबाईल, टॅब, लॅपटॉप, तसेच संगणकाद्वारे उपलब्ध करणे आजच्या काळात शक्‍य आहे. सर्व शाळा, महाविद्यालयांमधून स्पर्धा परीक्षेपासून अगदी इंजिनिअरिंग, वैद्यकीय या क्षेत्रांसाठीही जागतिक स्तरावर नवीन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणपद्धती वेगाने तयार होत आहे. अशा प्रकारची शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांसाठी सोयीची असल्यामुळे अशी यंत्रणा स्पर्धा परीक्षेसाठी असावी असे, बहुसंख्य विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावरच लक्षात आले. त्यातूनच महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांसाठी शिवनेरी फाउंडेशनने हमखास यशासाठी यंत्रणा तयार केली. गेल्या काही दिवसांत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी याची विचारणा केली, अगदी माफक साडेबारा हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ​

कोणत्या सुविधा मिळणार? 

  • राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 1 व पेपर 2 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमांमधील सर्व घटकांचे व्हिडिओ लेक्‍चर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. या व्हिडिओ लेक्‍चर्समध्ये प्रत्येक विषयामधील प्रत्येक घटक त्या विषयामधील तज्ज्ञ शिक्षकांमार्फत शिकविण्यात आला आहे. 
  • विद्यार्थ्यांना दोनशे तासांचा अभ्यासक्रम पेनड्राइव्ह तसेच मेमरी कार्डमध्ये उपलब्ध. 
  • विषयाचा अभ्यास कसा करायचा येथपासून ते परीक्षेमध्ये प्रश्‍न कसे विचारले जातात, ते कसे सोडवायचे, आपण नेमके कोठे चुकतो याचेही व्याख्यानातून मार्गदर्शन. 
  • अभ्यासामधील अद्ययावत घटना विद्यार्थ्यांना पुढील 18 महिने त्यांच्या व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात नियमितपणे पाठविण्यात येणार. यामुळे विद्यार्थ्यांना सद्य घटनांसाठी वेगळा वेळ देण्याची आवश्‍यकता भासणार नाही. 
  • विद्यार्थ्यांना आपली सर्व तयारी एकाच ठिकाणी करता येणार आहे. अद्ययावत घटना व्हिडिओ लेक्‍चर आणि पीडीएफ स्वरूपात उपलब्ध. 
  • या अभ्यास पद्धतीमुळे विद्यार्थ्याला संबंधित विषयामधील सर्व संकल्पना समजावून घेता येणार आहेत. 
  • विद्यार्थ्याला वर्षामधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे सराव पेपर व उत्तरपत्रिका परीक्षेअगोदर सरावासाठी पाठविण्यात येतील. 
  • विद्यार्थ्याला आवश्‍यक असल्यास या प्रश्‍नपत्रिकांचे मूल्यमापन करून मिळणार. 
  • प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याच्याजवळ किमान अँड्राईड मोबाईल आहे, त्याला या सर्व सुविधा घेता येणार. 
  • पेपरमधील प्रत्येक घटकाचे नियोजन कसे करावे येथपासून ते परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पेपर सोडविण्याची पद्धत याचे नियोजन विद्यार्थ्यांना देण्यात येणार. 

या गोष्टी विसरू नका

आधीचे लेख आणि बातम्या :

Web Title: Sakal Shiveri Foundation MPSC UPSC Exam Test Series Online Education