‘सकाळ’ची महिलांसाठी अभिनव स्पर्धा; आकर्षक बक्षिसांचा धमाका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

ऑफिस आणि घरातील कामातून स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे महिलांसाठी एक कसरतच असते. तरीही थोडा वेळ काढून ‘सकाळ’च्या वाचक असणाऱ्या महिला नित्यनेमाने ‘मैत्रीण’ हे सदर वाचतात. आता हा सहभाग तुम्हाला प्रत्यक्ष नोंदविता येणार आहे. ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ आजपासून (ता. ५) महिलांसाठी अभिनव स्पर्धा घेऊन आले आहेत.

पुणे - ऑफिस आणि घरातील कामातून स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे महिलांसाठी एक कसरतच असते. तरीही थोडा वेळ काढून ‘सकाळ’च्या वाचक असणाऱ्या महिला नित्यनेमाने ‘मैत्रीण’ हे सदर वाचतात. आता हा सहभाग तुम्हाला प्रत्यक्ष नोंदविता येणार आहे. ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ आजपासून (ता. ५) महिलांसाठी अभिनव स्पर्धा घेऊन आले आहेत. ‘कुपन भरा, यशाचा किल्ला सर करा’ ही ६० दिवसांची बक्षीस योजना असून, सर्व वयोगटांतील महिला सहभाग नोंदवू शकतील. या उपक्रमाची ब्रॅंड ॲम्बेसिडर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही स्पर्धा ५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी दरम्यान होणार असून, पुरवणीत दररोज एक कुपन प्रसिद्ध होईल. प्रत्येक कुपनामध्ये एक प्रश्‍न विचारला जाईल. या प्रश्‍नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. यामध्ये तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन सहभागी होता येईल. ऑफलाइन स्पर्धेसाठी एक प्रवेशिका प्रसिद्ध केली जाईल. या प्रवेशिकेवर ७२ दिवसांत प्रसिद्ध होणाऱ्या ६० पैकी किमान ५० कुपन चिकटविणे अनिवार्य आहे. १ फेब्रुवारी २०२१पूर्वी ही प्रवेशिका नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयात जमा करावी. 

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोंदणीसाठी सरकारकडून मुदतवाढ

अशी आहेत आकर्षक बक्षिसे   
बंपर बक्षीस
स्कूटी पेप प्लस (एकूण ८)
पहिले बक्षीस 
सोन्याची ठुशी (एकूण २५)
दुसरे बक्षीस
पैठणी (एकूण २००)
तिसरे बक्षीस
चांदीचे नाणे (एकूण ५००)
चौथे बक्षीस
फ्राय पॅन (एकूण १०००)
याव्यतिरिक्त सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

पुणे : दापोडे गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अटक 

स्पर्धा ऑफलाइन आणि ऑनलाइनही
अचूक उत्तरांची संख्या, नीटनेटकेपणा, सजावट, सुवाच्य अक्षर या निकषांवर ऑफलाइन स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात येईल. ऑनलाइन सहभागासाठी सदरामध्ये कुपनच्या शेजारी ‘क्यूआर’ कोड दिला जाईल. तो ‘क्यूआर’ कोड स्कॅन करून चार पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग

सहभागासाठी आजच ‘सकाळ ॲक्टिव्ह’ ॲप डाउनलोड करा आणि नावनोंदणी करा. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून, सहभागी झालेल्या प्रत्येकीला हमखास बक्षीस मिळेल. स्पर्धा सर्व वयोगटांतील महिलांसाठी खुली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal women abhinav competition maitrin gift