#SakalForMaharashtra एकत्र येऊया...ला विविध मान्यवरांचा प्रतिसाद

SakalForMaharashtra Come together to respond to various personalities
SakalForMaharashtra Come together to respond to various personalities

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

 'सकाळ'च्या आवाहनाची दखल घेऊन काही मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

मानव धर्म म्हणून संस्कार व्हावेत
बाळ जन्माला येते वेळी..त्याला कळत नाही. आपण कोणत्या जातीत, धर्मात जन्माला आलेलो आहोत. त्याला कळतं ते मोठ झाल्यावर, त्याची जात आणि धर्म. आपण सर्व सारखे आहोत. बालमनावर जात धर्माचे संस्कार न देता. मानव धर्म म्हणून संस्कार व्हावेत, आम्ही विद्यार्थावर संस्कार देताना मानव म्हणून देत असतो. विदयार्थी आणि पालक यांच्या नात्यात दरी वाढत चालली, म्हणून पालक सभा घेते. यावेळी विद्यार्थी पालक एकत्र घेतो. आम्ही त्यांना कुटुंबा विषयी मार्गदर्शन करतो. हा सर्व धर्म समभाव रुजवण्याचा प्रयत्न आहे, दैनिक सकाळ ने सुरू केलेल्या उपक्रमास माझ्या शुभेच्छा आणि या उपक्रमात सहभागी होण्यास निश्चित आवडेल.
-गुलाबराव पाटील, सम्राट अशोक हायस्कुल कल्याण पूर्व मुख्याध्यापक 

संघटीत शक्ती उभारून जाब विचारू
आज मुंबई सबर्बन रेल्वे प्रवासात दैनंदिन 80 लाखाच्या घरात प्रवासी आपल्या पोटापाण्याकरिता प्रवास करतायेत. माञ हा प्रवासी वर्ग संघटीत नसल्याने लोकप्रतिनिधींना त्यांच्या समस्यांचे गांभिर्य नाही. संघटीत होऊन रेल्वे प्रशासनाला जाब विचारायला समोर येत नाही. त्यामुळे त्यांचाही अनागोंदी कारभार बळावलाय. या समस्येला वाट करून देण्याकरिता आम्ही 10-12 सहकारी एकञ येऊन के 3 रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना केली व एक संघटीत शक्ती उभी राहावी जेणेकरून लोकप्रतिनिधींना ही पण एक मतपेटी आहे, या भावनेतून किमान समस्यांचे गांभिर्य कळेल. याशिवाय धुंदीत मश्गुल असलेल्या रेल्वे प्रशासनाला सदैव वचक राहील. आता संघटनेत क्रियाशील सभासदांची संख्या 75 वर पोहचली. संघटनेचे फेसबुक पेजवरही सहकारी जोडले जात आहेत. यातून मोठी चळवळ उभी करण्याचा आमचा मानस आहे. यातून मेटाकुटीला आलेल्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखादायी होईल. 'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' यातून दैनिक 'सकाळ'ने जे व्यासपीठ उभे केले आहे. ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे, व यातून ही चळवळ व्यापक करण्यात मदत होईल. 
-श्याम उबाळे,  कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात निर्माण झाले पाहिजेच
माणसाचं मन जिंकण्याचाच नाही तर समाजस्वास्थ चांगलं रहाण्याचा मार्गही व्यक्तीच्या पोटातुनच जातो. व्यक्तिसमुहांच्या हातात दगड बघायचे नसतील तर त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावाच लागेल. बदलत्या काळात ही रोजगार निर्मितीची जवाबदारी केवळ सरकारवर ढकलून जाणार नाही. काम मागणाऱ्यापेक्षा काम देणारे हात निर्माण झाले तर समाजस्वास्थ सुदृढ झाल्याशिवाय रहाणार नाही. सकाळचा हा उपक्रम म्हणुनच केवळ रोजगारनिर्मितीचं माध्यम नाही तर समाजसेवाही आहे. 'सकाळ'च्या उपक्रमात योगदान देण्याची माझी तयारी आहे.
- अॅड. जयेश वाणी

समाजाच्या उन्नतीकरता काम करणे गरजेचे
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिला नेहमीच सामान्य व्यक्तींच्या सपर्कात राहुन काम करावी लागतात. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आजारपणात आपल्या परिवारासोबत सर्वात जास्त दिलासा देण्याचे काम वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला करावेच लागते. सध्याची राज्यात उद्भवलेली परस्थिती पाहता कोणी तरी पुढाकार घेउन समाजाच्या उन्नतीकरता काम करणे गरजेचे आहे. या करता समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना एकत्रीत करण्याची संकल्पना पुढे आणत 'सकाळ'ने सुरू केलला उपक्रम प्रशंसनीय असुन. या चळवळीत योगदान देन्याची माझी तयारी आहे.

- डॉ. सुयोग पाटील, श्री क्लिनीक कळंबोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com