#SakalForMaharashtra आम्हीही समाजासाठी काहीतरी करू पाहतोय

SakalForMaharashtra We are also trying to do something for the society
SakalForMaharashtra We are also trying to do something for the society

पुणे : मुंबई - महाराष्ट्रातील सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, समाजानेच एकत्र येऊन समस्यांवर मार्ग शोधण्याच्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी मान्यवर व सामाजिक संस्थांनी ‘सकाळ’च्या अभियानात शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत, तरुणांमधील कौशल्यविकास, तसेच महिलांची आर्थिक सुरक्षा, एकूणच समाजाच्या उभारणीसाठी पैसा, वेळ, तसेच उद्योजकता-व्यावसायिकतेचा कानमंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. #SakalForMaharashtra

सुरुवातीला दोन वर्ष शेती केली पण त्यातून उत्पन्न खर्चही निघत नाही. त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नाही. असेच प्रत्येक शेतकरी कुटुंबातील तरुणाची व्यथा आहे. रोजगार निर्मीतीसाठी राज्य शासनाने प्रयत्न करायला पाहीजे, आपल्या राज्यातील रोजगार कुठे पळवला जातोय याकडे लक्ष दिले पाहीजे. 'सकाळ'ने सुरु केलेल्या रोजगार व कौशल्य विकासासाठीच्या उपक्रमात सहभागी होऊ. 

-गजानन पाटील, पुणे. 

प्रत्येक शेतीपिकाला हमी भाव मिळाला पाहीजे. शिक्षणात आरक्षणाची गरज आहे. मराठा मुलांना 80 ते 90 ट्‌क्‍के गुण मिळवुन त्यांना योग्य संधी मिळत नाही. नोकऱ्यांची कमतरता आहे. रोजगार निर्मीतीसाठी शासनाने प्रयत्न करायला पाहीजे. वंचित मुलांना न्याय मिळाला पाहीजे. 'सकाळ'च्या या उपक्रमात सहभाग नोंदवुन युवक महिलांच्या उत्थानासाठी प्रयत्न करु. 

-अजित राऊत, कोल्हापुर.
 
कौशल्य विकासा योजनेची माहीती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवायला पाहीजे. रोजगार निर्मीती करण्यासाठी प्राधान्याने लक्ष द्यायला पाहीजे. ही निर्मीती होतांना त्याला पुरक कुशल मनुष्यबळ निर्मीती होने गरजे आहे. 'सकाळ'ने सुरु केलेल्या या उपक्रमात सहभागी होऊ. युवकांच्या प्रश्‍नांकडे सरकारने लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी नुसते प्रयत्न नव्हे तर ते प्रश्‍न सुटले पाहीजे. 

-राजेंद्र सुपे, विजय प्रताप युवामंच, सोलापुर
 
कौशल्य विकासावर आधारित तेरा वर्षांपासून एमपीटीए मार्गदर्शन करीत आहेत. पन्नास हजार हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणबरोबर मानधनही उपलब्ध करून दिले आहेत. 'सकाळ'ने हाती घेतलेल्या 'एकत्र येऊया मार्ग काढूया' हा उपक्रम समाजशिल आहे. यात आम्ही सहभाग घेणार आहे. 'सकाळ' आणि एमनीटीएच्या माध्यमातून कौशल्या विकाससंदर्भात राज्यभर मार्गदर्शन शिबिर घेण्याची आमची इच्छा आहे. यासह प्लंबर, दुचाकीचा मॅकनिक यांना मान-सन्मान मिळत नसल्याने याकडे सहसा कोणी वळत नाही. यांना परदेशात मोठी मागणी आहेत. 'सकाळ' आणि एमपीटीए मिळून हा सन्मान मिळवू देऊ शकतो. 

- प्रसाद रामचंद्र कराडकर, संचालक, एमपीटीए एज्युकेशन लिमीटेड, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com