ठाकरे-शहा ठरवरतीलं तोच युतीचा फॉर्म्युला 

Residencial Photo
Residencial Photo

ठाकरे-शहा ठरवरतीलं तोच युतीचा फॉर्म्युला 
नाशिक, ता. 7- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप-शिवसेनेची युती होणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल अन्य लोकांनी त्यांचे मत मांडून संभ्रम निर्माण करू नये असा टोला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला. युतीच्या जागा वाटपाचा 50-50 चा फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 
नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. शिवसेनेचे नेते राऊत यांनी नाशिक मधील एका कार्यक्रमादरम्यान युतीच्या जागा वाटपात प्रत्येकी निम्म्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित झाल्याचा दावा महाजन यांनी फेटाळतं पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तोच अंतिम फॉर्म्युला राहणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीतही युती व्हावी, अशी सर्वांचीचं इच्छा असल्याने चर्चेच्या माध्यमातून जागा वाटपाबाबत तोडगा काढला जाईल. राज्यात सद्यस्थितीत 288 पैकी 123 आमदार भाजपचे तर 62 आमदार शिवसेनेचे आहेत. काही जागांबाबत मतभेद आहेत. यावर तोडगा निघेल. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील तोच अंतिम निर्णय राहणार असल्याने अन्य कोणाला मत व्यक्त करण्याची गरजं नाही. नारायण राणे यांचा भाजप मध्ये तर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवरून "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ' असे आमचे ठरलेले नसल्याची टिप्पणी त्यांनी केली. जळगावचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी महाजन यांना पराभूत न केल्यास वडीलांचे नाव लावणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यावर पाटील यांचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचे सांगत महाजन यांनी मला पराभूत करण्यापेक्षा वडीलांचे नाव कसे राखता येईल, याची चिंता करण्याचा सल्ला दिला. 
उत्तर महाराष्ट्रात 42 जागा 
उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 47 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहील. चार-पाच जागा सोडल्यास 42 जागांवर युतीचे उमेदवार सहज विजयी होतील असा दावा महाजन यांनी केला. काही जागांवरील मतभेद मिटल्यास शंभर टक्के यश पदरात पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पडणाऱ्या 4-5 जागांमध्ये कुठल्या जागांचा समावेश राहील याबाबत हसतं विषय टाळला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com