'सकाळ'चे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सोनवणे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांचा गाढा अभ्यास होता

'सकाळ'च्या सोलापूर आवृत्तीत ते सन 2000 पासून कार्यरत होते. नगरविकास, महापालिका प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्‍न, सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. सोलापूर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले. पत्रकारितेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सोलापूर महापालिकेच्या वतीने आदर्श पत्रकार म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.  

सोलापूर : सोलापूर सकाळचे मुख्य शहर बातमीदार विजयकुमार सोनवणे (वय 45) यांचे आज (रविवारी) निधन झाले. फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार सोनवणे यांचा अंत्यविधी उद्या (सोमवारी) सकाळी आठ वाजता होणार आहे. त्यांची अंत्ययात्रा सकाळी आठ वाजता शरदचंद्र शाळेसमोरील उमानगरी येथील त्यांच्या राहत्या घरापासून रूपाभवानी जवळील स्मशानभूमी येथे निघणार आहे. 

'सकाळ'च्या सोलापूर आवृत्तीत ते सन 2000 पासून कार्यरत होते. नगरविकास, महापालिका प्रशासन, राजकारण, शहरी भागाचे प्रश्‍न, सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. सोलापूर प्रेस क्‍लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे. सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले. पत्रकारितेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांना सोलापूर महापालिकेच्या वतीने आदर्श पत्रकार म्हणूनही सन्मानित करण्यात आले होते. विविध संस्था व संघटनांनी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेऊन त्यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्‍चात एक भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal's main city correspondent Vijaykumar Sonawane passed away