एसटी कर्मचाऱ्यांना धक्का; वेतनाला लागणार कात्री

ST
ST

मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या पाच विभागांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात अचानक कपात करण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे कपात केलेले वेतन काहीच दिवसांत मिळणार असल्याची नोटीस विभागातील सूचना फलकांवर लावण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर प्रथमच नियमित वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तुलनेत सिंधुदुर्ग विभाग ७० टक्के, त्याप्रमाणेच ठाणे ६० टक्के, सातारा ८० टक्के, अकोला ७० टक्के, रत्नागिरी ८० टक्केच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यातच उस्मानाबाद, गडचिरोली, नांदेड, नाशिक विभागातील प्रत्येक एका बस डेपोतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात झाली आहे. महामंडळाचा ५०० कोटींचा संचित तोटा ५००० कोटींवर पोचला आहे.

गेल्या चार वर्षांत एसटीची एकही नवी एसटी रस्त्यावर आली नसून, शिवशाही प्रकल्पसुद्धा तोट्यात आहे. प्रवाशांनासुद्धा खिळखिळ्या एसटीचा प्रवास नकोसा वाटायला लागल्याने एसटी प्रवाशांमध्ये घट झाली आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत खडखडाट दिसून येत आहे. त्यात वेतनकपातीमुळे महामंडळ कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महामंडळावरील आर्थिक ताण असाच वाढत राहिल्यास ते बंद करण्याची वेळ येईल. आज कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली. उद्या वेतन मिळणार नाही. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. जर परिस्थिती नाही बदलली तर संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com