ऑक्‍टोबरमध्ये दोन लाख 84 हजार वाहनांची विक्री 

ऑक्‍टोबरमध्ये दोन लाख 84 हजार वाहनांची विक्री 

मुंबई : पेट्रोल, डिझेल दरवाढ होत असताना सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍टोबर महिन्यात वाहन विक्रीत वाढ झाली आहे. देशभरात तब्बल दोन लाख 84 हजार वाहनांची विक्री झाल्याचे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चर्स असोसिएशनने (सियाम) म्हटले आहे. तीन महिन्यांनंतर प्रथमच वाहन विक्री 1.55 टक्‍क्‍यांनी वाढल्याने कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात 1 लाख 85 हजार मोटारींची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 1 लाख 84 हजार मोटारींची विक्री झाली. बहुउद्देशीय वाहनांच्या विक्रीत 3.90 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. वाहनांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे "सियाम'चे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले. 82 हजार 414 बहुउद्देशीय वाहनांची विक्री झाली. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मोटारींच्या किमतींमध्ये कपात केली होती, त्यामुळे मागणी वाढली होती. आता अशाच प्रकारचा प्रतिसाद मिळाला असल्याचे सेन यांनी सांगितले. 

वाणिज्य वापरातील वाहनांच्या मागणीमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. गेल्या महिन्यात देशभरात 87 हजार 147 वाणिज्य वाहनांची विक्री झाली. ज्यात 24.82 टक्‍क्‍यांची वाढ झाली. त्याचबरोबर हलक्‍या वजनाच्या वाणिज्य वाहनांच्या विक्रीत 29 टक्‍क्‍यांची वाढ झाली. अवजड वाहनांच्या विक्रीतही 17 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली. 30 हजार 832 अवजड वाहनांची गेल्या महिन्यात विक्री झाल्याचे "सियाम'च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. 
 
दुचाकींना ग्रामीण भागात मोठी मागणी 
ग्रामीण भागात मोटारसायकलींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात एकूण 20 लाख 28 हजार दुचाकींची विक्री झाली. ज्यात 13 लाख 27 हजार मोटारसायकलींची विक्री झाली. स्कूटर विक्रीत 12.5 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली, तर 6 लाख 43 हजार स्कूटर्सची विक्री झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com