सलमान खानच्या घरात राहत होता अट्ट्ल गुन्हेगार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सलमान खानच्या बंगल्यातून मुंबई पोलिसांनी एका अट्ट्ल गुन्हेगाराला आज अटक केली. सलमानच्या गारोई इथल्या बंगल्यात हा आरोपी केअर टेकर म्हणून राहत होता. शक्ती सिद्धेश्वर राणा असे त्याचे नाव आहे.

मुंबई : सलमान खानच्या बंगल्यातून मुंबई पोलिसांनी एका अट्ट्ल गुन्हेगाराला आज अटक केली. सलमानच्या गारोई इथल्या बंगल्यात हा आरोपी केअर टेकर म्हणून राहत होता. शक्ती सिद्धेश्वर राणा असे त्याचे नाव आहे.

दरम्यान, राणा हा 15 वर्षांपासून सलमानच्या या बंगल्यात नोकर म्हणून राहात होता. त्याच्यावर चोरी आणि मारहाणीचा आरोप होता. शक्ती हा 29 वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेतला आरोपी आहे. तपास करून पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, मुंबईतल्या वरळी इथं 1990 मध्ये घडलेल्या एका घटनेत शक्ती राणाला पोलिसांनी अटक केली होती. एका घरात घुसून मारहाण करणं आणि सामान लुटून नेणं असा त्याच्यावर आरोप होता. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन मिळाला. तेव्हापासून तो कधीच सुनावणीसाठी हजर राहिला नाही.

पोलीस या प्रकरणाचा शोध घेत राहिले मात्र शक्ती हा फरार झाला तो सापडलाच नाही. काही खबऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी 29 वर्षांचं हे जुनं प्रकरण पुन्हा बाहेर काढलं आणि शोधमोहिम राबवली. गोराईत त्याचा शोध घेत असताना तो एक बंगल्यात आढळला.

चौकशी केली असता हा बंगला सलमान खानचा असल्याची माहिती पोलिसांना कळाली. तो इथे आपली खरी ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khans caretaker arrested by mumbai police in criminal case