शिवसेना म्हणतेय ‘बारामतीत नव्या पवारांचा उदय’

SHI.jpg
SHI.jpg

मुंबई : बारामतीत नव्या पवारांचा उदय झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?’ या अमित शाह यांच्या प्रश्नाला रोहित पवारांनी दिलेल्या उत्तरामध्ये विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मते येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष संपेल व त्या पक्षात फक्त शरद पवार,अजित पवार आणि सुप्रिया सुळेच उरतील. पण एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे. २०१४ प्रमाणेच २०१९ च्या निवडणुकीतही शरद पवारांवरच हल्ले सुरू आहेत,’असं अग्रलेखात म्हटलं आहे.

पाच वर्षांमध्येफडणवीस सरकारने कोणती कामे केली हेसांगण्याऐवजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सोलापूर दौऱ्यामध्ये शरद पवार यांच्यावर घराणेशाही, भ्रष्टाचार या विषयांवरुन हल्लाबोल केल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे. पवारांवरील या टीकेवर ‘चौथ्या’पवारांनी उत्तर दिल्याचे सांगताना रोहित पावर यांचे कौतुक करण्यात आले आहे. पवारांच्या गोटातून इतक्या दिवसांत प्रथमच जोरदार तीर सुटल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

‘महाराष्ट्राच्या राजकारणावरील पवारांची मूठ ढिली पडल्याचे दिसत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली. हे इतके झाल्यावर पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारणारे म्हणजे डबल ढोलकीचे  राजकारण असल्याचा तीर रोहित पवारांनी मारला,’ असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

आहेत त्या पक्षात निवडून येणे शक्य नसल्याने नेते फायद्यासाठी पक्ष बदलतआहेत असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातआयाराम गयारामांचे पीक जोरात आले आहे. त्यातही आयारामांचाच जोर आहे. पण रावसाहेब दानवे म्हणतात त्याप्रमाणे ‘‘बाबांनो, इतकेही घुसू नका की आम्हालाच बाहेर पडावे लागेल.’’ अशी स्थितीशिवसेनेची झाली आहे. आयारामांची रांग शिवसेनेतही लागली आहे. पण आमच्याकडेमाणसं धुवून घेण्याचे वॉशिंग मशीन नसल्याने माणसं पारखूनच घ्यावी लागतात. पक्ष बनतातआणि कमजोरदेखील होतात. पण कोणताच पक्ष कधीच कायमचा संपत नाही याचे भान राजकारणातील प्रत्येकाने ठेवायला हवे. असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com