संभाजी भिडे रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्‍तदाब कमी झाल्‍याने महाडच्‍या ग्रामीण रूग्‍णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

रायगड : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रक्‍तदाब कमी झाल्‍याने महाडच्‍या ग्रामीण रूग्‍णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संभाजी भिडे पुण्‍याहून रायगडकडे येत असताना त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्‍याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली.

Web Title: Sambhaji Bhide admitted in hospital