भिडेंचा 'आंबा' सोशल मीडियावर व्हायरल...

मंगळवार, 12 जून 2018

भिडेंच्या वक्तव्यावरून फेसबुकस व्हॉट्सअॅप, ट्विटरवर असंख्य जोक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंब्याचा सिझन संपला असला तरी, भिडेंच्या शेतातला आंबा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.  

संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विनोदांना उधाण आले आहे. भिडे म्हणाले होते की, 'माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.' या वक्तव्यावरून फेसबुकस व्हॉट्सअॅप, ट्विटरवर असंख्य जोक्स व्हायरल होत आहेत. त्यामुळे आंब्याचा सिझन संपला असला तरी, भिडेंच्या शेतातला आंबा सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.   

यापैकीच व्हायरल झालेले काही जोक्स!
आंबा खाऊन मुले होत असतील तर लग्न करायची गरज आहे का? 

गुरुजींनी सुचवलेल्या आंबे खाऊन मुलं होण्याच्या जालीम उपायानंतर, आंबे खायला एकच झुंबड उडाली...

भिडयांच शिव प्रतिष्ठान त्यांचं चिन्ह आंबा करणार म्हणे...

या आंब्यामुळे जो लोकसंख्या वाढीचा धोका उत्पन्न झाला, त्याने कुटुंब नियोजन खात्याचे धाबे दणाणले

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ज्याप्रमाणे राष्ट्रपित्याचा चष्मा वापरुन एक सुंदर लोगो बनवला गेला; त्याप्रमाणे आंबे-विरोधी मोहिमेसाठी कुटुंब नियोजन खाते आंब्याचा फोटो वापरून नवीन टॅगलाईनची स्पर्धा घेणार असल्याचे कळते!

आंबे खाणं थांबवा,
पाळणा लांबवा!

नसबंदी नकोच आता, आता कसली भीती,
आंबा खायचं थांबवा, हीच मूल न होण्याची क्लृप्ती!

देशाचा करा विचार, 
नका करू आंबे खायचा अविचार!

आंबे खा कमी, 
लोकसंख्या होईल कमी!

'आम के बच्चे'
आम खाओ, बच्चा पैदा करो! ये नया संशोधन महाराष्ट्र में भिडे नामक वैज्ञानिक ने किया! विश्व में नई क्रांति लाने का दावा!

भिडे गुरुजींचं आंब्याविषयीचं वक्तव्य वाचून सकाळपासून मन एखाद्या व्हायरसच्या शोधात, सर्व फाइल्सची झडती व्हावी तसं आंब्याचा उल्लेख असलेल्या सर्व गाण्या-कवितांच्या ओळींमध्ये शिरून गुरुजींच्या दाव्याच्या अंगाने काही गवसतंय का, ते शोधत होतो...

कारटे, आधी खरं खरं सांग, कुणाकडचे आंबे खाऊन आलीस?

या आंबे प्रकरणामुळे पोरी स्वावलंबी झाल्या तर काय करायचं पोरांनी...??

काल बाजारातुन डझनभर आंबे आणलेत, लोकं येगळ्याच नजरेने बघुन राहिलेत...

Web Title: sambhaji bhide s mango viral on social media