अकरावी ॲडमिशनबाबतची 'ती' अट रद्द करा; संभाजी ब्रिगेडने केली मागणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी असताना अकरावी प्रवेशासाठी आर्थिक  उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले जात आहे. परंतु राज्यातील विशेष मागास प्रवर्गासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांची 'नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची ची अट रद्द करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पुणे - पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठी असताना अकरावी प्रवेशासाठी आर्थिक  उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागितले जात आहे. परंतु राज्यातील विशेष मागास प्रवर्गासाठी अकरावीच्या विद्यार्थ्यांची 'नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची ची अट रद्द करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील मराठा समाज आरक्षणाच्या संघर्षानंतर एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले. त्यामुळे राज्यातील सर्व मराठा समाजाच्या शिक्षण व नोकरीत आरक्षणाचा फायदा झाला. मात्र चालू 2020-21 मध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र राज्य सरकारने बंधनकारक केलेले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात व राज्यामध्ये कोरोनाचे संकट वाढत आहे. पुणे जिल्हा रेड झोनमध्ये आहे. तरीही राज्य सरकार विद्यार्थ्यांना वेठीस धरून महा-ई-सेवा केंद्रांसमोर गर्दी करून प्रमाणपत्र काढण्याचा घाट घालत आहे. मुळात जिल्ह्यासह राज्यातील महा-ई-सेवा केंद्र सध्या बंद आहे. चालू असतील त्या ठिकाणी विनाकारण गर्दी केली, तर कोरोनाची लागण विद्यार्थ्यांना होऊ शकते. याची जबाबदारी सरकार घेणार का? त्यामुळे सध्या गर्दी टाळणे हे राज्याच्या व सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे, असे संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर

राज्यातील मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्य सरकार आता विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण व्हावी अशा पद्धतीचे जाचक नियम करीत आहे. मात्र संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. नॉन क्रिमिलियरची अट तात्काळ रद्द करून विद्यार्थी व पालकांना तात्काळ दिलासा द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.

पुणे : कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फसवणूक; बेकायदेशीरपणे फी वसूल​

संघटनेचे पदाधिकारी प्रशांत धुमाळ आणि संतोष शिंदे यांनी सांगितले, की शिक्षण उपसंचालक अनुराधा ओक यांना आज या बाबत घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि सरकार बरोबर तात्काळ ई मेलद्वारे पत्र पाठवून सोमवारपर्यंत निर्णय घेऊन ही अट रद्द होईल असे आश्वासन त्यांच्याकडून घेऊन हे आंदोलन थाबवण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Brigade has demanded that condition of non creamy layer Certificate be abolished