Maharashtra Politics: शेतकरी जगला तर... संभाजी राजे यांचा राज्यकर्त्यांना संतप्त सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Sambhaji Raje Bhosale

Maharashtra Politics: शेतकरी जगला तर... संभाजी राजे यांचा राज्यकर्त्यांना संतप्त सवाल

गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही. राज्याच्या या कारभारावर खासदार संभाजी राजे छपत्रती यांनी संताप व्यक्त केली आहे. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केलीय.( Sambhaji chhatrapati slams maharashtra government Cm Eknath Shinde )

राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. काही ठिकाणी तर गारपीटी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं झोपली आहेत.

गहू, ज्वारी, कापूस, सोयाबीन सह इतर महत्त्वाची हाती आलेली पीकं हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रब्बींच्या पिकांसह फळबागांचंही नुकसान झालं आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

यापार्श्वभूमीवर ट्विट करत संताप व्यक्त केला. 'अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे.

अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते ? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल.' अशा आशयाचे ट्विट संभाजी राजे यांनी केलं आहे.

नाशिक जिल्ह्यात सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने द्राक्ष, गहू, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्यातील मालेगांव, मंगरुळपीर, रिसोड, मानोरा आणि कळंबा महाली, पांगरी नवघरे, इंझोरी, वाई वारला, पांगरा बंदी, वनोजा, खिर्डासह अनेक ठिकाणी शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे.

त्यामुळे शेकडो हेक्टरावरील डाळिंब, लिंबू बागांसह टरबूज, कांदा, उन्हाळी मूग, रब्बी गहू, हरभरा या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. या पीक नुकसानीचे पंचनामे करून दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Sambhaji Raje