Sambhaji Nagar Violence: छत्रपती संभाजी नगरमधील परिस्थिती कशी? CM शिंदेंनी दिली माहिती

काल रात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.
CM Eknath Shinde on Sambhaji Nagar Violence
CM Eknath Shinde on Sambhaji Nagar ViolenceEsakal

मुंबई : छत्रपती संभाजी नगरमध्ये काल रात्री दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसक घटनेनंतर दगडफेक आणि वाहनांच्या जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. राम नवमीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

सध्या या ठिकाणची परिस्थिती कशी आहे, याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (Sambhaji Nagar Violence How is the situation CM Eknath Shinde gives info)

CM शिंदे म्हणाले, मी पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांशी बोललो आहे. पहाटे ही घटना घडली होती आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे. (Latest Marathi News)

CM Eknath Shinde on Sambhaji Nagar Violence
MNS Vasant More: वसंत मोरेंविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र? नव्या घटनेवरुन व्यक्त केली जाहीर नाराजी

"याबाबत मी संपूर्ण माहिती घेतली असून तिथं जे राम मंदिर आहे, तिथं थोडासा वादविवाद झाला. सध्या इथला परिसर पूर्णपणे कन्ट्रोलमध्ये आहे. सर्वांनीच तिथं शांतता राखली पाहिजे, राम नवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मिय सर्व सण एकत्र येऊन साजरा करतात. (Sambhaji Nagar News)

त्यामुळं सर्वधर्मियांना माझं आवाहन आहे की, राम नवमी आणि रमजानचा सण एकत्र येतो आपण तो दरवर्षी साजरा करतो. या उत्सवांना सर्वांनी शांततेत सहकार्य केलं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत इथं शांतता आबाधित राहिल यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे" असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com