मोठी बातमी : संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, म्हणालेत...

सुमित बागुल
Thursday, 17 September 2020

पूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जो पर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये.

मुंबई : काल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची कॅबिनेट मिटिंग झाली. या मंत्रिमंडळ बैठकीतअनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला घेला. यामध्ये महाराष्ट्र राज्यात विविध पदांसाठी साडेबारा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुणांसाठी काल मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. दरम्यान, काल सरकारने घेतलेल्या निर्णयावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली स्पष्ट भूमिका मंडळी मांडली आहे 

संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, "जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये." अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींकडून केली जातेय. याच मागणीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना एक पत्र देखील लिहिलंय.

काय म्हणटलंय पत्रात :

संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, "जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती घेण्यात येऊ नये." मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली याचे तीव्र पडसाद मराठा समाजात उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलिस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केलाय.

मराठा समाज या निर्णयाचा विरोध करणार हे माहित असूनही तुम्ही पोलिस भरती काढलीत, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मराठा समाजाला एकटे पडण्याचा हा कुटील डाव तर नाहीना ? अशी प्रतिक्रिया समाजातील जाणकारांकडून येत आहे. मी शासनाला एकाच सांगू इच्छितो की मराठा समाज इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि या लढ्यात सर्व जाती आणि समूह मराठा समाजाच्या सोबत आहे. मोठा भाऊ अडचणीत आल्याने सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या बाजूने उभा होता, आहे आणि राहणार.

जे आरक्षण मिळाले होते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत. आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती काढू नये. सध्याचा परिस्थितीत नोकर भरती केल्यास त्याविरोधात मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक  सौहार्द्य टिकवून ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा.

sambhajiraje chatrapati writes letter to Uddhav thackeray regarding police recrutment


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhajiraje chatrapati writes letter to Uddhav thackeray regarding police recrutment