माघार घेणार की लढणार?; संभाजीराजे काही वेळातच मांडणार भूमिका

दरम्यान, आज ते आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्याआधी त्यांनी शिवरायांसमोर नतमस्तक झालेला फोटो शेअर केला आहे.
Sambhajiraje Chhatrapati News
Sambhajiraje Chhatrapati NewsSakal

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवरून राज्यात सध्या घमासान सुरू आहे. राज्यातल्या सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात संभाजीराजे अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी पाठिंब्यासाठी सर्व पक्षांना आवाहन केलं होतं. शिवसेनेची पक्षप्रवेशाची अट नाकारल्यानंतर शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर करत संभाजीराजेंची कोंडी केली आहे. आता संभाजीराजे काय करणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. (Sambhajiraje Chhatrapati Press Conference)

संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आपलं खासदारकीचं सत्र संपल्यानंतर पुढच्या निवडणुकीसाठी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. ज्या भाजपाच्या पाठिंब्यावर ते आधी राज्यसभेवर गेले होते, त्या भाजपाने 'संभाजीराजे अद्याप त्या मागणीसाठी आमच्याकडे आलेले नाहीत, ते आले तर आम्ही विचार करू' अशी भूमिका घेतली. तर राष्ट्रवादीने सुरुवातीला संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. मात्र शिवसेनेकडे (Shivsena) महाराष्ट्रातल्या सहापैकी सर्वाधिक दोन जागा असल्याचं पाहून चेंडू शिवसेनेकडे टोलवला गेला.

Sambhajiraje Chhatrapati News
राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत?

शिवसेनेकडून एका जागेवर संजय राऊत (Sanjay Raut) जाणार हे तर फिक्स होतं. आता प्रश्न होता दुसऱ्या जागेचा. या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार जाणार हे त्यांचं ठरलं होतं. आता संभाजीराजेंना आम्ही उमेदवारी देऊ फक्त त्यांनी हाती शिवबंधन बांधावं, अशी भूमिका सेनेने घेतली. संभाजीराजेंनी मात्र शिवबंधन बांधण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली नाही. त्यामुळे अखेर शिवसेनेने संभाजीराजेंची कोंडी करण्यासाठी कोल्हापुरातले पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार (Sanjay Pawar)यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

Sambhajiraje Chhatrapati News
फक्त संभाजीराजेच नाही तर अख्ख्या करवीर संस्थानचा इतिहास स्वाभिमानाचा

त्यामुळे आता सेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार हे दोघे उमेदवार असतील हे जाहीर झालं. त्यामुळे संभाजीराजेंची चांगलीच कोंडी झाली. आता राजे माघार घेणार की लढणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे आपली भूमिका मांडणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या पत्रकार परिषदेत संभाजीराजेंची भूमिका काय असेल हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com