"सातारची गादी कशी..."; संभाजीराजेंच्या माघारीनंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडल्याची भावना व्यक्त करत संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSakal

संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा आज केली. शिवसेनेने त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली होती. मात्र संभाजीराजेंनी ही ऑफर नाकारली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीबद्दल आपल्याला दिलेला शब्द मोडला, अशा शब्दांत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्यांच्या माघारीवर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Rajyasabha Election)

संभाजीराजेंनी आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)आपला शब्द कसा पाळला नाही, हे सविस्तर सांगितलं. त्यांनी शिवसेनेवर भरपूर टीकाही केली. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते अरविंद सावंत (Shivsena Leader Arvind Sawant) यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना सावंत म्हणाले, "शिवसेना बाळासाहेबांचे संस्कार, विचार घेऊन चालते. सुदैवाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बाळासाहेबांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द मोडला असं कधीच झालेलं नाही. या उमेदवारी प्रकरणात कधीच कुठे एकही बातमी आली नाही की शिवसेना पुरस्कृत उमेदवार उभा करणार आहे".

Sambhajiraje Chhatrapati
कोणापुढे झुकून खासदारकी घेणार नाही; संभाजीराजेंची 'स्वाभिमाना'ने माघार

एका कडव्या शिवसैनिकाला संधी मिळावी अशी उद्धव ठाकरेंची अपेक्षा होती, असंही अरविंद सावंत यांनी सांगितलं. सावंत म्हणाले, "गेल्या वेळी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा राष्ट्रवादीने त्यांना दोन जागा मिळाव्यात असा आग्रह धरला. उद्धव ठाकरेंनी तेव्हा त्यांच्या आग्रहाला मान दिला आणि राष्ट्रवादीनं फौजिया खान यांचं नाव उमेदवार म्हणून दिलं. त्यांचे दोन उमेदवार तेव्हा राज्यसभेवर (RajyaSabha) गेले. त्यामुळे आता आमची वेळ होती. हे दोन्ही उमेदवार मूळचे शिवसेनेचेच असायला हवे, हा विचार पक्ष आणि संघटना म्हणून महत्त्वाचा आहे. म्हणूनच एका कडव्या शिवसैनिकाला ही संधी द्यावी असं उद्धव ठाकरेंच्या मनात होतं".

सावंत पुढे म्हणाले की, संभाजीराजेंबद्दल आदर ठेवून सांगतो. तुम्ही खरंच एक नामी संधी घालवलीत. सातारची गादी कशी फिरली बघा. आधी राष्ट्रवादीत होती, मग भाजपात गेली. पण तरी गादीबद्दलचा आदर कमी झाला नाही. तुमच्याबद्दलचा आदरही कमी होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत. इतके चांगले संबंध असताना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना डावलून तुम्हाला संधी द्यायची तयारी दाखवलेली. पण तुम्ही ती स्विकारली नाही आणि एक नामी संधी गमावली. असो, तुमच्या आत्ताच्या भूमिकेचंही आम्ही स्वागतच करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com