संभाजीराजेंच्या उपोषणाला रशियातून विद्यार्थ्यांचा पाठिंबा

युध्दपरिस्थितीत सुध्दा तरुणांचा उपोषणाला पाठिंबा दिला
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal

मुंबई: मराठा समाजाच्या (Maratha Reservation) पाच मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे पर्याय उरला नाही म्हणून मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर उपोषणास बसलो आहोत असे संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी सांगितले. काल सुरु झालेल्या या आंदोलनाला मुंबईचे डबेवाले, अनेक नेते तसेच तरूण वर्गांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान आज नाँरदन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी रशिया (Russia) मधिल तरुणांनी युध्द परिस्थितीत सुध्दा उपोषणाला पाठिंबा दिला आहे अशी माहिती संभाजीराजे यांनी ट्विट करत दिली आहे.

Maratha Reservation
नारळ फुटता फुटेना, स्वप्न काही सूटेना; ठाकरेंवर राणेंचे टीकास्त्र

काय म्हणाले हे तरूण

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्दजन्य परिस्थिती आहे. अशावेळी भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. अशावेळी रशियात असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ केला आहे. यामध्ये हे तरूण म्हणतात, आमचा राजा आज आमच्यासाठी उपाशी झोपून आंदोलन करत आहेत. सध्या याठिकाणी युध्दजन्य परिस्थिती आहे. मात्र, आमचे लक्ष राजेंच्या उपोषणाकडे आहे. माफ करा राजे याआधी आम्हाला पूर्वजांनी उपाशी झोपू दिले नाही. मात्र तुम्ही आमच्यासाठी उपाशी झोपत आहात. हे खूप मोठ दुर्देव आहे अशी खंत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

समाज बांधवाना विनंती करताना तरूण म्हणाले, आम्ही सगळ्या समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो की, आम्ही आज राजेंच्या मागे उभे आहोत. आपणही साथ द्या अशी विनंती या तरूणांनी केली. छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देऊन संभाजीराजेंना पाठिंबा दर्शविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com