समीर वानखेडेंच्या अडचणी संपेनात, कोपरी येथे व्हावे लागणार हजर

Sameer Wankhede
Sameer Wankhedesakal media

ठाणे : वादग्रस्त पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत, नुकचेच त्यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता चौकशीसाठी त्याना येत्या २३ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलिस स्टेशन येथे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान नवी मुंबई येथे सतगुरु रेस्टॉरंट आणि बारचे लायसन्स घेतल्या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केल्या नंतर सदरचा गुन्हा ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे, नंतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वानखेडे याना बोलाविण्यात आले आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई (Navi mumbai) येथे बारच्या परवान्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर असून याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वानखेडे हे २३ फेब्रुवारी रोजी कोपरी येथे जाण्याची शक्यता आहे.

Sameer Wankhede
घरी बसून फोनवर करा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, पाहा सोपी प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com