
यशवंतराव चव्हाणांची बदललेली भूमिका, नाशिकराव तिरपुडे यांचा स्वभाव, तळवलकरांचं लेखन आणि किसन वीर यांची ठाम भूमिका असे अनेक संदर्भ तळवलकरांच्या लेखात आणि पवारांच्या मुलाखतीत आहेत.
शरद पवार यांनी काल (दोन डिसेंबर) टीव्हीवर सविस्तर मुलाखत दिली. खूपसाऱया गोष्टींचा खुलासा केला. विद्यमान राजकीय परिस्थिती कशी निर्माण होत गेली, हे कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं. काँग्रेसशी मतभेद असतानाही सहमती घडवून आणण्यातले प्रयत्न, अजित पवारांनी करून ठेवलेले उद्योग, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली चर्चा, अमित शहा-देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची त्यांची मते पवारांनी मोकळेपणानं मांडली. कालच्या मुलाखतीतल्या प्रश्नांवर उत्तर देताना पवारांनी अनेकदा, 'त्यात दोन गोष्टी आहेत...' अशी सुरूवात केली. प्रत्यक्षात उत्तरात अनेक बाजू येऊन गेल्या.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
बहुतांशवेळा पवारांच्या कृती आणि विधानांभोवती धुकं निर्माण केलं गेलं. पवार ते धुकं दूर करत बसले नाहीत. ते त्यांच्या मार्गानं जात राहतात. पसरलेलं धुकं गडद झालं, तरी त्याची फिकीर बाळगत पवार बसले नाहीत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही पवारांभोवती धुकं निर्माण केलं गेलं. पवार त्यांच्या त्यांच्या मार्गानं गेले आणि महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशा विलक्षण युतीचं सरकार आलं. तरीही एक धुकं मागं राहिलंच होतं.
- सिंचन प्रकल्पाचे 'ग्रहण' अजित पवारांच्या नाही तर, फडणवीसांच्या मागे
पवारांनी बहुदा पहिल्यांदाच नजिकच्या भूतकाळाकडं वळून पाहिलंय आणि राहिलेलं धुकं झटकून टाकलंय. सहसा ते असं करत नाहीत, म्हणून या मुलाखतीचं विशेष महत्व. पवारांची आणि धुक्याची संगत 1978 पासूनची. 'वसंतदादांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसला...,' या थिअरपीपासूनची. अनेक ठिकाणी महाराष्ट्र टाईम्सचे तत्कालिन संपादक गोविंद तळवलकर यांच्या नावावर ही कॉन्स्पिरसी थिअरी (conspiracy theory) खपवली जाते. काहीवेळा तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं नाव घेतलं जातं.
वसंतदादांचं सरकार पवारांनी बंड करून पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. वसंतदादांना कोणतीही कल्पना नसताना हे सरकार पवारांनी पाडलं, अशी ही थिअरी. वसंतदादा आणि पवार रोज गळ्यात गळे घालून असत आणि एका रात्री अचानक पवारांनी वसंतदादांची सत्ता उलथवली, अशा कथा महाराष्ट्रात सांगितल्या जातात.
- काय घडलं बैठकीत? ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड
याबद्दल खुद्द पवारांनी नंतरच्या पंधरा-सतरा वर्षांत म्हणजे 1995 पर्यंत कुठं काही खुलासे केला, असं एेकलेलं-वाचलेलं नाही. नंतरही कधी त्यावर पवार स्वतः बोलले नाहीत. मात्र, खंजीराची थिअरी बेमालूम पवारांभोवती फिरत राहिली. खंजीराची थिअरी ही पवारांभोवती धुकं ठेवण्याचा पहिला प्रयोग. ते मुख्यमंत्री बनले, तेच मुळात खंजीर खुपसून, अशी ही थिअरी. तिथून पुढच्या पवारांच्या प्रत्येक निर्णयावेळी या थिअरीचा वापर विरोधकांनी केला.
पवारांनी काँग्रेस सोडणं, पुन्हा काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन करणं, नंतर काँग्रेससोबत केंद्रातही सत्तेत राहणं या सगळ्या प्रवासात खंजीराच्या थिअरीचं धुकं आसपास ठेवण्याची काळजी विरोधकांनी घेतली. पवारांना विश्वासार्ह्यता मिळू नये, याची दक्षताही विरोधकांकडून घेतली गेली. परवा अजित पवार रात्रीत भाजपसोबत उपमुख्यमंत्री बनले, तेव्हा 'पवारांनी पाठीत खंजीर खुपसला,' ही थिअरी पुन्हा डोकावली. व्हायरलही झाली.
पाठोपाठ पवारांच्या कट्टर विरोधक ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांच्या मुलाखतीही झळकल्या. या थिअरीवर पिढ्यान् पिढ्या पवार विरोध पोसवलेल्यांची चलती झाली. तळवलकरांनी तेव्हाच्या पवारांच्या बंडावर 2003 मध्ये काही लेक्चर्स दिली होती, अशी नोंद त्यांनीच करून ठेवली आहे. त्यामध्ये या बंडाचा आणि पवारांनी मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास सांगितला होता. मात्र, 16 वर्षांपूर्वीच्या माध्यमांमधून त्याची झालेली प्रसिद्धी मर्यादित असावी.
- सुप्रिया सुळेंची वडिलांवर भावूक पोस्ट; म्हणतात, श्रमलेल्या बापासाठी...
तळवलकरांनी 14 मार्च 2007 रोजी 'सकाळ'मध्ये याबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिला होता. त्यात त्यांनी याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं होतं. खंजीर खुपसल्याची भाषा खोटी आहे, असं तळवलकरांनी लेखात म्हटलंय. (सोबतच्या फोटोत तो मुळ लेख आहे.) तळवलकरांनी जो लेख लिहिला, त्यामागे 4 मार्च 2007 मध्ये प्रसिद्ध झालेली पवारांची दीर्घ मुलाखत कारणीभूत होती. (त्या मुलाखतीचा तेव्हढा भागही स्वतंत्र फोटोत आहे.)
यशवंतराव चव्हाणांची बदललेली भूमिका, नाशिकराव तिरपुडे यांचा स्वभाव, तळवलकरांचं लेखन आणि किसन वीर यांची ठाम भूमिका असे अनेक संदर्भ तळवलकरांच्या लेखात आणि पवारांच्या मुलाखतीत आहेत. व्हॉटस्अॅप फॉरवर्डवर संदर्भहिन 'वाचन संस्कृती' विकसित होत असतानाच्या आजच्या काळात पवारांनी तत्कालिन घडामोडींमागची भूमिका स्पष्टपणानं मांडलीय. ती लोकांसमोर जात असतानाच जुन्या, वठलेल्या धुक्यालाही हटवणंही आवश्यक वाटतं आहे.