Sandeep Deshpande : कोविड घोटाळ्यातल्या 'त्या' दोन संस्था कोणत्या? देशपांडेंनी नाव घेऊन केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandeep Deshpande

Sandeep Deshpande : कोविड घोटाळ्यातल्या 'त्या' दोन संस्था कोणत्या? देशपांडेंनी नाव घेऊन केला खुलासा

मुंबईः मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल झालेला हल्ला हा कोविड घोटाळा बाहेर काढल्यामुळे झाल्याचं उघड होत आहे. संदीप देशपांडे यांनीच आज याबाबत खुलासा केला. आपण दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होतो, याचा सुगावा त्यांना लागल्याने हल्ला झाल्याचं देशपांडे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातमध्ये झालेल्या कोविड घोटाळ्यासंबंधी बोलतांना संदीप देशपांडे म्हणाले की, दहा लाखांमध्ये टर्नओव्हर असलेल्या दोन संस्था कोविडमध्ये कोटींमध्ये गेल्या. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या संस्थांकडे कोविड सेंटरमध्ये कॉट, बेडशीट, गाद्या पुरवण्याचं काम होतं. परंतु त्यांनी ते पुरवलं नाही.

याप्रकरणी आपण चौकशीची मागणी केल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे. ज्या व्यक्तीने हा घोटाळा केला त्याचं नाव जेडिया असून त्याचे फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहेत, असा खुलासा देशपांडे यांनी केला.

भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार- देशपांडे

माझ्यावर हल्ला झालेला असला तरी मी यापुढे भ्रष्टाचारी प्रकरण बाहेर काढणार आहे. आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही. खरंतर सुरक्षेची गरज मला नसून ज्यांनी हल्ला केला त्यांना आहे, असं देशपांडे म्हणाले. संजय राऊतांबद्दल बोलतांना ते म्हणाले की, राऊतांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे. त्यामुळे ते अशी विधानं करीत आहेत.

काल नेमकं काय घडलं?

मनसे नेते संदीप देशपांडे हे आज पहाटेच्या सुमारास शिवाजी पार्क परिसरात मॉर्निग वॉकसाठी गेले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी अचानक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला चढवला. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे.

टॅग्स :Raj Thackeraymns