Vidhan Sabha 2019 : 'नितेश राणे उनाड विद्यार्थी'

Vidhan Sabha 2019 : 'नितेश राणे उनाड विद्यार्थी'

मुंबई : भाजपचे उमेदवार नितेश राणे हे एक उनाड विद्यार्थी आहेत. त्यांना कोणत्याही शाळेत घातले तरी ते सुधारणार नाहीत, अशा शब्दांत नारायण राणे यांचे कट्टर विरोधक संदेश पारकर यांनी आज (गुरुवार) टीका केली. 

कणकवली मतदासंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करून शिवसेनेत प्रवेश करणारे पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, नितेश राणेंना भाजपच्या शाळेत दाखल करून संयमाचे धडे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी नितेश राणे यांच्यासारखा उनाड विद्यार्थी कोणत्याही शाळेत घातला तरी सुधारणार नाही.

सतीश सावंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल (बुधवार) कणकवलीत सभा झाली. त्यादरम्यान संदेश पारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संदेश पारकर यांनी नारायण राणे आणि नितेश राणेंवर जोरदार टीका केली. 

राणेंच्या घरी शुकशुकाट

विधानसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचे समजत असल्याने नारायण राणे यांच्या घरी आत्ताच शुकशुकाट पसरला आहे, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com