कोल्हापूर : संध्यादेवी कुपेकर यांचा विधानसभा लढविण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कुपेकर यांनी आज मुंबईत भेट घेऊन प्रकृती अस्वास्थामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संध्यादेवी या निवडून आल्या होत्या. तसेच 2014 सालची निवडणूकही त्यांनी जिंकली होती. पक्षाने आपल्याला संधी दिली. पक्षही माझ्या पाठीशी पूर्ण क्षमतेने उभा राहिला, याबद्दल त्यांनी पवार यांचे आभार मानले. 

मुख्यमंत्री म्हणाले, दोन्ही राजे भाजपमध्ये आले, पण...

मी पक्षाच्या विचारांचीच असून नेहमी पक्षाच्या सोबत राहण्याची ग्वाही देत कुपेकर यांनी यावेळी दिली. माझ्याऐवजी इतरांचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी पवारांकडे केली. संध्यादेवी यांच्या या निर्णयानंतर चंदगडमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. तेथे राष्ट्रवादी कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandhyadevi Kupekar will not Contest Assembly Election