स्वीकृतच्या लॉटरीत पाटील की नाईक? चेंडू पुन्हा नेत्यांच्या कोर्टात

स्वीकृतच्या लॉटरीत पाटील की नाईक? चेंडू पुन्हा नेत्यांच्या कोर्टात
स्वीकृतच्या लॉटरीत पाटील की नाईक? चेंडू पुन्हा नेत्यांच्या कोर्टातSakal

सांगली : महापालिकेतील काँग्रेसच्या स्वीकृत सदस्य निवडीचा तिढा कायम आहे. सादर झालेले दोन्ही मयूर पाटील (Mayur Patil)व राजेश नाईक (Rajesh Naik) यांचे प्रस्ताव प्रशासनाकडून छाननीत वैध ठरवले आहेत. मात्र आता यातल्या कोणाची निवड करायची यावर आज रात्री उशिरापर्यंत याबाबत काँग्रेस नेत्यांच्यामध्ये खल सुरू होता. नेत्या जयश्री पाटील (Jayashrre Patil)यांच्या गटातर्फे राजेश नाईक तर विश्‍वजित कदम (vishwajeet kadam)यांच्याकडून मयूर पाटील यांच्या नावाची शिफारस झाल्याची चर्चा आहे. दरम्यान स्वीकृत निवडीसाठी येत्या सोमवारी (ता.२५) विशेष महासभा होत आहे.

करीम मेस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या जागी नाईक यांची निवड करण्याचा निर्णय पलूस येथे काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत झाला होता. नाईक यांचे नाव जाहीर करण्यात नेत्यांनी थोडी घाईच केली. कारण आता काँग्रेसमध्ये महापालिकेत तरी एकमुखी नेतेपद कोणाकडे नाही. त्यामुळे या नेत्यांनी जाहीर केलेल्या नावावर दुमत होणार हे निश्‍चित होते. तसेच झाले. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली होती. कदम यांचे खंदे समर्थक मयूर पाटील यांचे नाव अचानकपणे पुढे आले आहे.

दरम्यान, नाईक यांच्या नावाचा प्रस्ताव छाननीसाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पाटील यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची शिफारस आणली. त्यामुळे बुधवारी पाटील यांच्या नावाचा प्रस्तावही प्रशासनाकडे छाननीसाठी सादर करण्यात आला होता. छाननीत नाईक व पाटील यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. दरम्यान स्वीकृतसाठी पाटील किंवा नाईक यापैकी एकाचे नाव अंतिम करून तसा प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे सादर करावा, असे पत्र नगरसचिव विभागाने काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांना दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वीकृतचा चेंडू गटनेत्यांसह काँग्रेस नेत्यांच्या कोर्टात आला आहे. यामुळे निवडीत रंगत निर्माण झाली आहे.

स्वीकृतच्या लॉटरीत पाटील की नाईक? चेंडू पुन्हा नेत्यांच्या कोर्टात
'लाल दिव्याच्या गाडीसाठी गद्दारी करणाऱ्यांनी पक्षनिष्ठा शिकवू नये'

मेंढे - पृथ्वीराज यांच्यात खलबते

आज दुपारी नगर सचिव विभागाचे पत्र मिळताच गटनेते मेंढे यांनी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. स्थानिक नेते तसेच जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर उद्याच अंतिम नाव कळवले जाईल, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com