काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच तौफिक शिकलगारांचा एकतर्फी विजय

महापालिका प्रभाग- 16 निकाल ; कॉंग्रेसला बळ देणारा, भाजपला अंतर्मुख करणारा निकाल
bjp, congress
bjp, congressesakal

सांगली : काँग्रेस आणि भाजपने (Congress, BJP)प्रतिष्ठा पणाला लावलेल्या महापालिकेच्या प्रभाग १६ च्या पोटनिवडणुकीचा निकाल कॉंग्रेसला बळ देणारा तर भाजपला अंतर्मुख करणारा आहे. तौफिक शिकलगार यांच्या विजयाने काँग्रेसने जागा राखण्यात यश मिळवले. तर पुढील वर्षीच्या महापालिकेच्या निवडणुकीत काय परिस्थिती असेल याची चुणूक भाजपला दाखवली आहे. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam)यांच्याबरोबरच विशाल पाटील, जयश्री पाटील शहराच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत असल्याचे दिसून आले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या प्रभाग १६ अ ची पोटनिवडणूक चांगलीच रंगली. मात्र प्रचारात जेवढी रंगत आली तेवढी चुरस विजयात दिसलीच नाही. भाजपचा एकतर्फी पराभव त्यांच्या नेत्यांना धक्का देणारा आहे. माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाली. ओबीसी आरक्षित असलेली ही जागा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खुल्या गटात वर्ग करून निवडणूक घेण्यात आली. तरीही कॉंग्रेस आणि भाजपने ओबीसी उमेदवार दिले. हारूण शिकलगार यांचे पुत्र तौफिक यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यावर त्यांना सहानुभूती मिळणार का अशी एक चर्चा होती. मात्र भाजपने ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र ताकद

काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांच्याबरोबरच नगरसेवक मयुर पाटील यांनी फिरोज पठाण, अभिजीत भोसले, मंगेश चव्हाण तसेच युवा नेते अमर निंबाळकर यांनी तौफिक यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रभागात बैठका घेतल्या. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवकचे शहराध्यक्ष राहुल पवार, सागर घोडके, उमर गवंडी यांनीही शिकलगार यांच्या पाठीशी ताकद उभी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या एकत्र ताकदीमुळे तौफिक यांचा एकतर्फी विजय झाला.

bjp, congress
रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांत कवठे महंकाळात जुंपली

भाजपचे अपुरे प्रयत्न

या प्रभागात भाजपच्या दोन महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे तिसरी जागाही जिंकून महापालिकेत आपली ताकद विस्तारण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासून भाजपने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन वेळा प्रभागात बैठका घेतल्या. आमदार सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांनी प्रचार सांगता दणक्यात केली. माजी आमदार नितीन शिंदे प्रभागात तळ ठोकून होते. युवा नेते सुजित राऊत यांनी प्रभाग पिंजून काढला. याशिवाय माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार तसेच स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने ही सुद्धा फौज प्रचारात होती. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

काँग्रेसमध्ये नेतृत्व स्पर्धा

या निवडणुकीत काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी जातीने लक्ष घातले. पुढच्या वर्षी महापालिका निवडणूक तर त्याचा पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत आहेत. यानिमित्ताने शहराच्या नेतृत्वात कमी पडू नये. यासाठी चौघांनीही ही निवडणूक गांभीर्याने घेतली. त्यामुळे यापुढे महापालिकेचा नेतृत्वासाठी या चौघांमध्ये स्पर्धा राहणार आहे.

राष्ट्रवादीही कमी नाही

महापालिकेचा इतिहास पाहता राष्ट्रवादीला सांगली शहरात आपले बस्तान बसवता आलेले नाही. मदन पाटील यांच्या निधनानंतर या शहरात नेतृत्वाची पोकळी होती. तरीही मदन पाटील गटाचे शहरावर वर्चस्व आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीही शहरात बस्तान बसवण्यासाठी प्रयत्नवादी असल्याचे दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com