नवीन दंत महाविद्यालयास मान्यता देऊ - महाजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सांगली - वसंतदादा शासकीय रुग्णालयास "आयुष'च्या माध्यमातून 50 खाटांचे नवीन रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाला मान्यता देऊ, कर्करोगग्रस्तांसाठी अद्ययावत नवीन केंद्र सुरू करू, तसेच शासकीय रुग्णालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिली. 

पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाअंतर्गत विविध विभागांचे उद्‌घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ""सरकारने महाअवयवदान चळवळ हाती घेतली आहे. मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत 12 हजारांवर अधिक रुग्ण नोंदणीकृत आहेत. यकृताच्या प्रतीक्षेतही पाच हजारांवर रुग्ण आहेत. ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयवदानासाठी पुढे यावे.'' 

Web Title: sangli news girish mahajan Dental College