मराठ्यांना आरक्षण संसदेतच शक्‍य- आठवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सांगली - मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय राज्य सरकारच्या हाती नाही. या स्थितीत लोकसभेत ठराव करून देशात आरक्षण 75 टक्के केल्यास मराठा, जाट, रजपूत, जैन, शीख अशा सर्व घटकांना आरक्षण देणे शक्‍य होईल. मराठ्यांना 16 व इतरांना एकत्रित 9 टक्के आरक्षण देता येईल, अशी भूमिका सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. 

ते म्हणाले, ""आरक्षणाबाबत मराठा समाजाची स्थिती बदलली आहे. आता इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाची सकारात्मक भूमिका पुढे आली आहे. मी "एनडीए'च्या चर्चेत आरक्षणाचा पॅटर्न बदलण्याचा मुद्दा मांडला आहे. लोकसभेने कायदा केल्यास ते शक्‍य होईल.'' 

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अत्यंत ज्येष्ठ व काळाचा ठाव घेणारे नेते आहेत. त्यांना कॉंग्रेस आता लवकर सत्तेत येणार नाही, याची माहिती आहे. ते भाजपसोबत आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे मत आठवले यांनी मांडले. तसेच यापुढील काळात मोदीच भाजपचा चेहरा असतील, असेही आठवले यांनी सांगितले. तसेच शिवसेना-भाजपमध्ये वाद नसल्याचे सांगत सध्याचे राज्यातील फडणवीस सरकार स्थिर असल्याचेही आठवले यांनी या वेळी नमूद केले. 

दलित, मुस्लिमविरोधाचा अपप्रचार 
आठवले म्हणाले, ""भाजप हा मुस्लिम, दलितविरोधी असल्याचा अपप्रचार केला जातोय. देशातील 125 कोटी जनतेच्या विकासाची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. त्यात मुस्लिम आहेतच. दलितांवर अत्याचार होता कामा नये, यासाठी आम्हीही आग्रही आहोत.'' 

Web Title: sangli news ramdas athawale maratha reservation