संजय राऊतांनी सांगितलेली आयुर्वेदिक कोंबडी सापडली (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

- कडकनाथ जातीची ही कोंबडी आहे
- औषधी गुणधर्मामुळे या कोंबड्याना खूप मागणी आहे.
- मध्य प्रद्रेशातील झाबुआ जिल्ह्यातून या कोंबडीचा जगभरात प्रचार झाला.
- इतर कोंबड्याच्या तुलनेत या कोंबडीच्या मांसाला चांगली चव असते.
- या कोंबड्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी असते.
- या कोंबडीच्या मटणात लोह आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण अधिक आहे.
- त्यामुळे या कोंबडीचे मटण आरोग्यासाठी चांगले असते.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दावा केलेल्या आयुर्वेदिक कोंबडीचा शोध साम वाहिनीने नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात जाऊन घेतला आणि तेथे आढळून आली ही आयुर्वेदिक कोंबडी.  

राज्यसभेत सोमवारी आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना राऊत यांनी अंडी आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा देऊन टाका, ही मागणी केली आहे. राऊत यांनी काही उदाहरणे देत आयुष मंत्रालयाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि हे नक्की केले पाहिजे असे म्हटले होते. यावेळी राऊत म्हणाले होते, की एकदा महाराष्ट्रातल्या नंदुरबारमध्ये गेलो होतो. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तिथल्या काही आदिवासी बांधवांनी मला जेवणाचं ताट आणून दिले. मी त्याला विचारलं काय आहे जेवणात? तर तो म्हटला ही कोंबडी आहे. मी म्हटलं मला कोंबडी नको, तर तो म्हटला ही आयुर्वेदीक कोंबडी आहे जी तुम्ही खाल्लीत तर तुमच्या शरीरात जर काही आजार असतील तर ते बरे होऊ शकतात. आम्ही या कोंबडीचे पालनपोषणच अशा रितीने करतो की ती आयुर्वेदीक कोंबडी म्हणूनच वाढवली आहे. आयुष मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे.

यानंतर साम वाहिनीने शोध घेतला आढळून आले की :
- कडकनाथ जातीची ही कोंबडी आहे
- औषधी गुणधर्मामुळे या कोंबड्याना खूप मागणी आहे.
- मध्य प्रद्रेशातील झाबुआ जिल्ह्यातून या कोंबडीचा जगभरात प्रचार झाला.
- इतर कोंबड्याच्या तुलनेत या कोंबडीच्या मांसाला चांगली चव असते.
- या कोंबड्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी असते.
- या कोंबडीच्या मटणात लोह आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण अधिक आहे.
- त्यामुळे या कोंबडीचे मटण आरोग्यासाठी चांगले असते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut claim ayurvedic hen found in nandurbar