'तुझा नऊ वाजताचा भोंगा बंद कर नाहीतर गोळ्या घालीन', संजय राऊतांना धमकी!|Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : 'तुझा नऊ वाजताचा भोंगा बंद कर नाहीतर गोळ्या घालीन', संजय राऊतांना धमकी! -

Sanjay Raut Death Threat realated morning press confrence : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांनी वेगळयाच चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे दिसून आले आहे.

संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. राऊत हे त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे राजकारणी आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या धारदार वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांना नामोहरम केल्याचे दिसून आले आहे. राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदेनं सत्ताधाऱ्यांना धडकी भरत असल्याचे त्यांच्या आतापर्यतच्या प्रतिक्रियेवरुन दिसून आले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आता राऊत यांना एका अज्ञात व्यक्तीनं फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यात त्या व्यक्तीनं तुझा सकाळचा नऊ वाजताचा भोंगा बंद कर अन्यथा तुला गोळ्या घालून मारण्यात येईल. अशा शब्दांत राऊत यांना धमकी देण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. यासगळ्यावर राऊत यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.

मी काही बोललो तर मला नावं ठेवली जातात. पण आता महाराष्ट्रात काय सुरु आहे याविषयी वेगळं काही सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. पवार साहेबांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. आम्हाला खोट्या केसेस मध्ये फसवून जेलमध्ये टाकण्यात आले. सरकारच्या विरोधात बोललो की अनेकांना मिर्च्या झोंबतात हे दिसून आले आहे. अशा शब्दांत राऊत यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

सुनील राऊत आणि धमकी देणारा यांच्यात जोरदार चकमक झाली आहे. त्यामुळे पाहू काय होतंय ते. मी काही फोन घेतलेला नाही. सुनील राऊत यांना त्या व्यक्तीनं फोन केला होता. त्यांच्यात बोलणं झालं. त्या तक्रारीची नोंद मी घेणार आहे. महाराष्ट्रात काय चाललं आहे हे काही कळायला मार्ग नाही. आवाज दाबला जात नाही म्हणून काटा काढण्याचा प्रकार होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.