
राज्यातील सरकार बेकायदेशीर, शपथविधी घेऊ नका; शिवसेनेचे राज्यपालांना पत्र
मुंबई : शिवसेनेने अधिकृतरित्या भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान शिवसेना कुणाच्याही दबावाखाली भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. शिंदे आणि भाजपने राज्यात स्थापन केलंलं सरकार हे बेकायदेशीर आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये यासाठी राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
(Sanjay Raut On Presidential Election)
दरम्यान, काल मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासंदर्भात बैठक झाली होती. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. पण अधिकृतरित्या त्यांना मतदान करण्याची घोषणा शिवेसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. राज्यातील सरकार हे बेकायदेशीर असून मंत्र्यांच्या शपथविधी घेण्यात येऊ नये अशा मागणीचे पत्र शिवसेनेने राज्यपालांना पाठवलं आहे.
हेही वाचा: "जलील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत, त्यांच्या मोर्चाला आम्ही महत्त्व देत नाही"
"काल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला पण काही लोकं असं म्हणतात की शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागला आहे आणि त्यांना न्याय मिळाला आहे पण शिंदे गटातील आमदाराला न्याय मिळाला नसून राज्यातील सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे." असं राऊत म्हणाले आहेत. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे कोणतंही घटनाबाह्य कृत्य राजभवनातून होणार नाही, आणि कोणत्याही मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही अशा मागणीचे पत्र राज्यपालांना पाठवण्यात आलं आहे असं राऊत म्हणाले आहेत.
Web Title: Sanjay Raut On Presidential Election And Shinde Bjp Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..