म्हणे देशात 36 राज्य ! संजय राऊतांच्या भूगोल अभ्यासावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

म्हणे देशात 36 राज्य ! संजय राऊतांच्या भूगोल अभ्यासावर नेटकऱ्यांनी घेतली शाळा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या परखड वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असतात. पण सध्या एका वेगळ्याचं गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका विधानामुळं, संजय राऊत यांचं भुगोल कच्चे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Sanjay Raut said that 36 states in the country troll social media )

नेमकं काय झालं?

संजय राऊत नेहमीसारखे आज सकाळी राज्यातील घडामोडींसंदर्भात माध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना चुकले अन् सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं.

“या देशात ३६ राज्य आहेत. ३६ मधल्या १६ चा आकडा काय घेऊन सांगताय? किती नावं घेऊ मी? यांचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आणि उत्तर प्रदेश आहे. बाकी काय आहे तुमच्याकडे? तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य हिमाचल प्रदेशही तुम्ही जिंकू शकला नाहीत”, अशीही टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली.

दरम्यान, संजय राऊत यांचं भुगोल कच्चे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कारण देशात २८ राज्य आहेत. 'राऊतजी देशात ३६ नव्हे तर २८ राज्य आहेत.' अस राऊतांना सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Sanjay Raut