
Sanjay Raut : संजय राऊत राष्ट्रवादीच्या विरोधात का बोलू लागले?
Sanjay Raut shivsena MP comment on NCP Jayant Patil : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहे. एकेकाळी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या बाजुनं बोलणारे राऊत गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या मुद्यांना खोडताना दिसत आहे. सावध भूमिका घेत त्यांनी राष्ट्रवादीवर टोलेबाजी करण्यास सुरुवात केली आहे. आताही राऊत यांनी जयंत पाटलांवर विचारलेल्या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राऊतांनी नेहमीप्रमाणे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. यानंतर राऊतांना जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी याविषयी राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यावर प्रतिक्रिया देतील. मी काहीही बोलणार नाही. अशी प्रतिक्रिया दिली होती.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
राऊतांच्या त्या प्रतिक्रियेनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी व्यक्त केलेली भूमिका चर्चेत आली होती. त्यानंतर पवारांनी देखील आपण सामनाला फारसं गांभीर्यानं घेत नसल्याचे म्हटले होते. तेव्हापासून राऊत आणि महाविकास आघाडी यांच्यात फारसं आलबेल नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राऊतांनी आजच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जयंत पाटलांच्या ईडीच्या प्रश्नावर घेतलेली भूमिका ही अनेकांना खटकली आहे. त्यामुळेच की काय राऊतांना आता राष्ट्रवादीनं दूर लोटले की काय असे प्रश्न सोशल मीडियावरुन विचारले जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे राऊत आता राष्ट्रवादीसाठी परके झाले की काय अशा तर्क वितर्कांना देखील उधाण आले आहे.
सत्तांतर झाल्यापासून आणि सरकारमध्ये बदल झाल्यापासून शिवसेना आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे 16 आमदार अपात्र होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तापत्रातून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला गेला होता.