Loksabha 2019: दानवेंबद्दलचा खैरेंचा आरोप खरा ठरला तर... -संजय राऊत

Loksabha 2019: दानवेंबद्दलचा खैरेंचा आरोप खरा ठरला तर... -संजय राऊत

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, खा. चंद्रकांत खैरेंनी दानवेंबद्दल केलेला आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील.

जालन्यासाठी आम्ही खोतकरांची समजूत काढली. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरै जे दानवेंबद्दल सांगत आहेत ते जर खरं ठरलं तर लोक बिथरतील. खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे, खैरे कधीही खोटं बोलत नाहीत. कागदोपत्री दानवेंचे जावई हे आमचेच आमदार आहेत. असेही संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत त्यांनी आपल्याला मदत केली नाही असा आरोप खैरेंनी केला होता. याची तक्रार भाजपच्या पक्षश्रेष्ठी आणि उद्धव ठाकरेंना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. दानवेंनी युतीचा नाही तर जावई धर्म पाळला, अशी टीका खैरेंनी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com