महाराष्ट्राच्या राजकारणाचा अॅमेझॉनवर डंका!

sarkarnama
sarkarnama

राजकीय घडामोडींची पडद्यावरील आणि त्यामागची बित्तंबातमी देणाऱ्या ‘सरकारनामा’ या वेबपोर्टलचा पहिला छापील दिवाळी अंकाची धूम चक्क अॅमेझॉनवर पाहायला मिळत आहे. अॅमेझॉनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत सरकारनामाच्या अंकाने 28 वा क्रमांक मिळविला आहे, तर भारतात नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये सरकारनामा पाचव्या स्थानावर आहे. बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत पहिल्या 50 पुस्तकांमध्ये स्थान मिळविणारे सरकारनामा एकमेव मराठी नाव आहे.

सरकारनामाचा दिवाळी अंक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. भविष्यकालीन घडामोडींचा वेध घेण्यासह राज्याच्या राजकारणात घडून गेलेल्या वेधक प्रसंगांच्या अनुभवांचा नजराणा वाचकांना मिळणार आहे. सुजाण आणि राजकीय विचारशक्ती जागृत असलेल्या मराठी वाचकांसाठी ‘सरकारनामा’ ही यंदाची आगळी भेट आहे. राजकीय कोलाहलातून नेमके काय आणि कसे निवडायचे, याची मांडणी ‘सरकारनामा’च्या दिवाळी अंकामध्ये आहे. 

‘सरकारनामा’चा हा अंक तुम्ही सहज घरपोच मागवू शकता. त्यासाठी अॅमेझॉनवर प्रकाशनपूर्ण नोंदणीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. तेव्हा त्वरा करा आणि आपली मागणी आजच नोंदवा. सरकारनामाच्या दिवाळी अंकाने अॅमेझॉनवर आपली विक्रमी वाटचाल कायम ठेवत भारतातील नव्याने प्रकाशित होणाऱ्या साहित्यामध्ये पाचवे स्थान मिळविले आहे. 

दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये
महासर्वेक्षण : आज निवडणूक झाली तर? 
कोण ठरणार हुकूमाचा एक्का- २०१९ ला कोणाची भूमिका ठरणार निर्णायक? 
महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकारणातील प्रभावी तरुण चेहऱ्यांची ओळख.
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती : मुख्यमंत्रिपदावर असताना ते काय शिकले? सहभाग- शरद पवार, मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस
चुरशीच्या लढती- राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक अटीतटीची होणार?
थोडक्‍यात राजकारणाविषयी सबकुछ माहिती करून घ्यायची असेल तर हा अंक संग्रही हवाच.

आपला दिवाळी अंक आजच बुक करा अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात...
क्लिक करा या लिंकवरhttps://goo.gl/LauiHb
अधिक माहितीसाठी-
व्हॉट्सअॅप : 91300 88459
फोन : 9881598815

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com