sarkarnama.in : विशेष बातम्या

sarkarnam
बुधवार, 19 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

राजू शेट्टी आणि खोत यांच्यातच पुढची लढत?
ऊस दराच्या प्रश्‍नावरून साखर सम्राटांबरोबरच सरकारलाही सळो की पळो करून सोडलेले खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरले जाण्याची शक्‍यता आहे. 

पूर्ण बातमी इथे वाचा

"समृद्धी'साठी मोजणीच अशक्‍य, तेथे भूसंपादन कसे होणार?
प्रस्तावित नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला गती येईल, असे स्वप्न राज्य सरकारकडून रंगवले जात असले तरी या महामार्गात आपली जमीन जाणार या भीतीपोटी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे. 

पूर्ण बातमी इथे वाचा

लातूरसाठी कॉंग्रेसपुढे भाजपाचे मोठे आव्हान 
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची कर्मभूमी म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखल्या जाणारा लातूर जिल्हा हा कॉंग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मानला जात होता. परंतु राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर लातूर शहरातील वारेही बदलायला लागले असून, उद्या 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लातूर महापालिका निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात माप टाकते याकडे लक्ष लागले आहे.

पूर्ण बातमी इथे वाचा
 

न्यू होरायझन इंस्टिट्यूटला मनसेचा दणका
नवी मुंबई ऐरोली येथील न्यू होरायझन इन्स्टिट्यूटला आज मनसेनेदणका दिलाय. या इंस्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांवर बारा हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व अभयसक्रमा व्यतिरिक्त कोर्सची सक्ती करण्यात येत होती. त्यामुळे इंस्टिट्यूटमधील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी कॉलेजची तक्रार मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्याकडे केली होती.

पूर्ण बातमी इथे वाचा

बॅंकेच्या कटकटीतून शिवेंद्रसिंहराजे "रिलॅक्‍स'! 
अजिंक्‍यतारा सहकारी बॅंक व अजिंक्‍यतारा महिला सहकारी बॅंक या दोन्ही बॅंका कऱ्हाड अर्बन बॅंकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अडचणीतील या संस्थांच्या विलीनीकरणाचा निर्णय झाल्याने सातारा तालुक्‍यातील ठेवीदारांचा प्रश्‍न सुटला आहे. 

पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

 

Web Title: Sarkarnama news bulletin

टॅग्स