sarkarnama.in : विशेष बातम्या

sarkarnama
सोमवार, 24 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

एमआयएम आमदाराने फोडले देशी दारूचे दुकान
औरंगाबाद : शहागंज भागातील पाण्याच्या टाकीजवळ नव्याने सुरू होणाऱ्या देशी दारू दुकानास परवानगी देऊ नका अशी मागणी करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील काही नगरसेवक व आपल्या समर्थकांसह दुपारी शहागंज भागात पोचले. लवकरच सुरू होणाऱ्या या देशी दारू दुकानाला कुलूप ठोकल्यानंतर हा जमाव चेलीपूरा येथे निदर्शने करण्यासाठी गेला. चेलीपूरा येथील दारूचे दुकान पाहून प्रक्षुब्ध झालेल्या तरुणांनी या देशी दुकानावर हल्ला चढवत दारू प्यायला आलेल्या ग्राहकांना मारहाण करत जोरदार तोडफोड केली.
पूर्ण बातमी इथे वाचा

राष्ट्रपतीपदासाठी मी इच्छुक नाही - शरद पवार
राष्ट्रपती पदासाठी आपले नाव चर्चेत आहे, असे विचारले असता श्री. पवार म्हणाले,""दोन्ही सभागृहात आम्हाचे पुरेसे संख्याबळ नाही. ज्या पक्षाचे दोन्ही सभागृहात मिळून फक्त 14 सदस्य आहेत, त्यांनी राष्ट्रपती पदाची स्वप्न पाहणे उचित नाही.
पूर्ण बातमी इथे वाचा

मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकणार : कडू
अकोला : नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडवणुकीविरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. शासनाने तूर खरेदी तातडीने सुरू केली नाही तर सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

पुरस्कार मिळाल्याने अजून लिहावेसे वाटते- शरद पवार
औरंगाबाद : "पुरस्कार स्वीकारायला जाणे आणि तिथे जाऊन भाषण करणे हा माझा स्वभाव नाही. पण "लोक माझे सांगाती' या माझ्या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेने पुरस्कार दिला. लिहिल्यावर पुरस्कार मिळतो म्हटल्यावर मला अजून लिहावे वाटते. पण मी पुस्तक लिहायला लागलो तर माझे लोक तुम्ही आता तेच करा म्हणतील' अशा मिश्‍कील शैलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
पूर्ण बातमी इथे वाचा

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून उठले वादळ
अकोला : उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव प्राप्त करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीवरून अकोल्यात वादळ उठले आहे. काही सामाजिक संघटनांनी बदली रद्द करण्याची मागणी रेटून धरली असली तरी जी. श्रीकांत यांची आजवरची जिल्ह्यातील कामगिरी म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची जोरदार टीका सोशल मिडीयावर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली चर्चेचा विषय ठरली आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

डॉ. जोशी यांचे संघभूमीला कोणते साकडे?
नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. डॉ. जोशी यांनी संघभूमीकडे कोणते साकडे घातले? याबाबत तर्क लावला जात आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

आश्विनी जोशींच्या बदलीने शोभांचा 'डे' ग्लॅड
मुंबई: मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची बदली केल्याचा आनंद वादग्रस्त लेखिका शोभा डे यांनी व्यक्त केला आहे. 'मुंबईला झुकते माफ देणाऱ्या उद्दाम अश्विनी जोशी यांची उचलबांगडी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार' असे ट्विट डे यांनी केले आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

खडसे, महाजनांच्या वादात विषय समित्या निवडीला खो
जळगाव - जळगाव जिल्हा भाजपत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अतंर्गत वाद दिवसेदिवस अधिकच धुमसत आहे. त्यातूनच आता भाजपची एकहाती सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेतील विषय समितत्यांची निवडही रखडली असून हा पेच कसा सुटणार याची प्रतिक्षा आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

अकोल्यातील ग्रामपंचायती कर्जमुक्तीसाठी करणार ठराव
अकोला : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शेतकरी जागर मंचने रणशिंग फुंकले आहे. कर्जमुक्तीच्या आंदोलनात जिल्ह्यातील सरपंचांना सहभागी करून घेत महाराष्ट्र दिनी एक मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कर्जमुक्तीचा एकमताने ठराव घेणार आहेत.
पूर्ण बातमी इथे वाचा

Web Title: sarkarnama news bulletin