sarkarnama.in : विशेष बातम्या

sarkarnama
मंगळवार, 25 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

शेतकऱ्यांची सरकारने पटकन दखल घ्यावी - उद्धव ठाकरे
शेतकरी परिस्थितीचा शिकार बनत आलेला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे, मला तशी अपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 
पूर्ण बातमी इथे वाचा

बकोरियांच्या बदली मागे "समांतर जलवाहिनीचा'मुद्दा
महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदलीवरून आता शहरातील राजकीय नेत्यामंध्ये वादावादी सुरू झाली आहे. शहरात चांगले काम करत असतानाच अधिकाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण केलेल्या बकोरियांच्या बदलीची कुणीही मागणी केलेली नव्हती. तरी देखील मुदतीच्या आत केवळ चौदा महिन्यात त्यांना घालवले. यामागे समांतर जलवाहिनीसाठी वॉटर युटिलिटी कंपनीशी केलेला करार रद्द करणे हेच प्रमुख कारण होते हे जवळपास स्पष्ट झाले आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

शिवसंग्रामने केले उठबशा आंदोलन
शेतकऱ्यांच्या तूर खरेदीच्या ज्वलंत प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उठबशा आंदोलन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. शिवसंग्रामचे विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात झालेल्या या अफलातून आंदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

नाशिक जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयाला शेतक-यांकडून टाळे
नोटबंदी जाहीर झाल्यापासन सरकारने जिल्हा बॅंकेची कोंडी केल्याने सध्या सर्व कामकाज ठप्प झाले आहे. पीककर्ज तर दूरच खात्यातील पैसेही मिळत नसल्याने त्रस्त शेतकरी आज मुख्यालयावर जमले व त्यांनी बॅंकेला टाळे ठोकले. ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेची नाडी असलेल्या बॅंकेच्या 67 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही नामुष्की ओढवली आहे.
पूर्ण बातमी इथे वाचा

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या
ठाण्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला दोन दिवसापासून गती मिळाली असून 1 मे रोजी अर्थात "महाराष्ट्र दिनी' गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसला "जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक राजकीय सूत्रांकडून देण्यात येत आहे. 
पूर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स