नारायण राणे 'राज्यसभेवर' जाणार?

Narayan Rane
Narayan Rane

मुंबई :  काँग्रेसमधून बाहेर पडलेले आणि स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मंत्रीमंडळात कधी वर्णी लागणार, याची चर्चा सध्या सुरू आहे. असे असतानाच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंना राज्यसभेची 'ऑफर' दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राणे ही ऑफर स्वीकारतात का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल. 

राणेंचे राजकीय डावपेच व अनुभवाबाबत भाजपला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे राणेंना ताटकळत ठेऊन भाजपला त्यांचा रोष ओढवून घ्यायचा नसल्याने त्यांना राज्यसभेवर घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, असेही सूत्रांकडून समजते. 

नारायण राणे यांना सत्तेचे गाजर दाखवत वेगळा पक्ष स्थापन करण्याचा डाव भाजपने खेळला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या नावाने स्थापित झालेला हा पक्ष अजूनही सुरुवातीच्या स्थरावर असताना राणेंचा स्वतःला या मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी आटापिटा सुरू आहे. परंतु त्यांची डाळ मात्र अजून शिजलेली दिसत नाही. 

बुधवारी(ता.७) मुख्यमंत्र्यांनी राणेंना राजभवनावर बोलवून घेतले होते. भाजपकडून त्यांचा विचार राज्यसभेसाठी केला जात आहे, असे सूत्रांनी नंतर सांगितले. 2019 ला राज्याच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राणे राज्यसभेचे हे गाजर स्वीकारतात का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

सेनेतून बाहेर पडल्यानंतर राणे यांनी काँग्रेसचा रस्ता धरला. काँग्रेसमध्ये त्यांना न पटल्याने  ते बाहेर पडले. आता त्यांचा भाजपशी मोट बांधण्याचा प्रयत्न असल्याने त्यात ते कितपत यशस्वी ठरतात ते येणारा काळच ठरवेल. 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नारायण राणेंचा रोष ओढवून न घेण्याचाच भाजपचा हा प्रयत्न आहे असे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com