नागपूरमध्ये यंदाची सरपंच महापरिषद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - कृषिकेंद्रित ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या "सकाळ माध्यम समूहा'च्या सहाव्या ऍग्रोवन सरपंच महापरिषदेला रविवारी (ता. 25) नागपूर येथे प्रारंभ होत आहे. कृषिविकास व ग्रामसमृद्धीला चालना देणाऱ्या या महापरिषदेत केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

नागपूरच्या आमदार निवासासमोरील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात होत असलेल्या या महापरिषदेचे फोर्स मोटर्स हे मुख्य प्रायोजक असून, दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स, सिंटेक्‍स इंडस्ट्रीज, ऍग्रोस्टार हे प्रायोजक आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण विभाग, तसेच रोजगार हमी योजना विभागाचा सहयोग या उपक्रमाला मिळालेला आहे.

महापरिषदेसाठी सरपंचांची निवडप्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. राज्यातील 28 हजारांवर सरपंचांमधून "सकाळ'च्या राज्यभरातील बातमीदारांमार्फत एक हजार सरपंचांची निवड करण्यात आली आहे. ग्रामविकासाला उभारी देण्यात राज्यातील तरुण तडफदार नव्या सरपंचांची भूमिका महत्त्वाची समजली जाते. निवडीमध्ये अशा उपक्रमशील सरपंचांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात बचत गट व महिला सबलीकरणाची चळवळ वेग घेत असल्याने महिला सरपंचांनादेखील या महापरिषदेत प्राधान्य देण्यात येत आहे. महापरिषदेच्या माध्यमातून या सरपंचांना ग्रामविकासाच्या मूलभूत बाबींचे प्रशिक्षण मिळणार आहे. आतापर्यंत राज्यातील सहा हजार सरपंचांनी महापरिषदेच्या माध्यमातून ग्रामविकासाचे प्रशिक्षण घेतले असून, गावाच्या विकासात ते मोलाची भूमिका बजावत आहेत.

सरपंचांसाठी दिशादर्शक
देशाच्या 73व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत राज व्यवस्थेला मुख्य स्थान देण्यात आले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध सुधारणा करताना ग्रामपंचायतीला मध्यवर्ती स्थान मिळाले आहे. केंद्र व राज्याचा निधीदेखील ग्रामपंचायतींना आता थेट दिला जात आहे. ग्रामपंचायतीत जमा होणाऱ्या निधीचे कायदेशीर कोशाध्यक्ष हे सरपंच आहेत, त्यामुळे सरपंचांची जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर या महापरिषदेचे आयोजन राज्यातील ग्रामपंचायती व सरपंचांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

Web Title: sarpanch mahaparishad in nagpur