‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटावर सरसंघचालकांची प्रतिक्रिया; म्हणाले...

Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal

आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला आपला इतिहास वाचत होतो. आता आपण भारताच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहत आहोत. आता आपण भारताचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि समजून घेत आहोत. त्याचा परिणाम देशाच्या भविष्यासाठी निश्चितच चांगला होईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले. (Sarsanghchalak Mohan Bhagwats reaction to the film Samrat Prithviraj)

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट (film) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. पृथ्वीराज चौहान व महंमद घोरी यांची लढाई आपण आधीच वाचली आहे. मला ती आवडली. ती कोणीतरी लिहिली आहे, असेही मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले. प्रत्येक मशिदीमध्ये (masjid) शिवलिंग कशासाठी शोधत आहोत?, असे एक दिवसापूर्वी ते म्हणाले होते.

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापले होते. या सूचना सर्वसामान्यांसाठी नसून भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांसाठी आहेत. असे काँग्रेस नेते विवेक तंखा म्हणाले होते. भागवत यांच्या विधानाशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे देवबंदचे उलेमा मुफ्ती असद कासमी म्हणाले होते. मलाही हेच हवे आहे. सर्व देशवासीयांना आणि देशातील सर्व धर्मनिरपेक्ष लोकांची इच्छा आहे की देशात शांतता, बंधुता राहावे आणि देशाने प्रगती करावी, असेही कासमी म्हणाले होते.

Mohan Bhagwat
प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधताय? मोहन भागवतांनी खडसावलं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com