सावकारीविरुद्ध सासवडला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सासवड - येथील एका बेकायदा सावकाराने गराडे (ता. पुरंदर) गावातील एकास सावकारीने पैसे देऊन ते सारे व्याजाने वसूल केले, तरी सुरक्षेपोटी घेतलेले कोरे चेक वापरून त्याला नोटीस पाठविली. त्याशिवाय त्याची दुचाकी व सोन्याच्या तीन अंगठ्या दमदाटी करून बळजबरीने नेल्या. या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस ठाण्यात याबाबत संशयित आरोपी नंदकुमार गेनबा जगताप (रा. सासवड, ता पुरंदर) या बेकायदा सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याला अद्यापी अटक झाली नसून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. फिर्यादी संतोष बुवासाहेब तरडे (वय ३९, रा. गराडे, ता.

सासवड - येथील एका बेकायदा सावकाराने गराडे (ता. पुरंदर) गावातील एकास सावकारीने पैसे देऊन ते सारे व्याजाने वसूल केले, तरी सुरक्षेपोटी घेतलेले कोरे चेक वापरून त्याला नोटीस पाठविली. त्याशिवाय त्याची दुचाकी व सोन्याच्या तीन अंगठ्या दमदाटी करून बळजबरीने नेल्या. या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलिस ठाण्यात याबाबत संशयित आरोपी नंदकुमार गेनबा जगताप (रा. सासवड, ता पुरंदर) या बेकायदा सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याला अद्यापी अटक झाली नसून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. फिर्यादी संतोष बुवासाहेब तरडे (वय ३९, रा. गराडे, ता. पुरंदर) हे असून, काल रात्री उशिरा सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सासवडचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी आज सांगितले. 

Web Title: sasawad crime against money lender