तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सात-बारा ग्राह्य धरणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मुंबई -  डिजिटल स्वाक्षरीच्या सात-बाराचे तूर्तास कोणत्याही प्रकारचे बंधन करता येणार नसून, तलाठ्यांच्या स्वहस्ते स्वाक्षरी व शिक्‍का मारलेले सात-बारा व्यवहारासाठी ग्राह्य धरता येतील, असे स्पष्टीकरण जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी दिले. डिजिटल स्वाक्षरीच्या आग्रहाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात सात-बारा मिळत नसल्याचे वृत्त "सकाळ'ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. 

मागील आठवड्यात काही दिवस ई-फेरफार प्रकल्पाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 29 जिल्ह्यांतील संगणकीकृत सात-बाराचे कामकाज पूर्णत: बाधित झाल्याची कबुली जमाबंदी आयुक्‍तांनी दिली आहे. त्यापैकी औरंगाबाद, नांदेड, नंदुरबार, परभणी आणि यवतमाळ हे जिल्हे वगळता इतर सर्व ठिकाणी कामकाज 1 जूनला सुरळीत झाल्याची माहिती आयुक्‍तांनी दिली. दरम्यान, डिजिटल स्वाक्षरीचे सात-बारा वितरण करण्याची योजना 1 मेपासून लागू केली आहे. आजपर्यंत 40 लाख सात-बारा डिजिटल स्वाक्षरीत तयार झालेले आहेत. त्यामुळे राज्यभरातील साडेसहा कोटी सात-बारा टप्प्याटप्प्याने डिजिटल स्वरूपात तयार करण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत संगणकीकृत सात-बारावर तलाठ्याने स्वहस्ते स्वाक्षरी व शिक्‍का मारलेले सात-बारा ग्राह्य धरण्यात यावेत, असे जमाबंदी आयुक्‍त एस. चोक्‍कलिंगम यांनी जाहीर केले आहे. 
 
Web Title: sat bara signature of talathi will be admissible