काॅंग्रेस नेत्याचे ठाकरेंना पत्र ; फडणवीसांच्या काळात 'या' कंपन्या महाराष्ट्रात आल्याच नाही, निदान आता तरी...

उमेश बांबरे
Thursday, 23 July 2020

केंद्राने एक एप्रिलला इलेक्‍ट्रॉनिक्‍स गुंतवणुकीकरिता जाहीर केलेल्या पीएलआय योजनेंतर्गत ऍपल फोन बनविणाऱ्या तैवानच्या कॉन्ट्रक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिंग कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. आता पेगॅट्रॉन ही कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. त्यामुळे या कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलेले आहे.

सातारा : फॅक्‍सकॉन कंपनी पुण्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक करणार असे यापूर्वीच्या फडणवीस सरकारने जाहीर केले होते; पण ती कंपनी महाराष्ट्राऐवजी तामीळनाडू व आंध्र प्रदेशात गेली. दुसरी विस्ट्रॉन कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात ऍपलच्या एकाही कंपनीने गुंतवणूक केलेली नाही. आता तैवानच्या कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. त्यामुळे या कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
'या' पालिकेच्या नगराध्यक्षांना काेराेनाची लागण
 
तैवानच्या कॉन्ट्रॅक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिंग कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा श्री. चव्हाण यांनी ट्‌विटरवरून व्यक्त केली आहे. याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्री कार्यालयालाही त्यांनी पाठविले आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पीएलआय योजनेंतर्गत ऍपलच्या कंपन्या भारतात गुंतवणकीच्या विचारात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सूचना करताना श्री. चव्हाण यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठविले आहे. याबाबतची माहिती श्री. चव्हाण यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी म्हटले, की यापूर्वीच्या फडणवीस सरकारने फॅक्‍सकॉन कंपनी पुण्यात 35 हजार कोटींची गुंतवणूक करणार असे जाहीर केले होते; पण ती कंपनी महाराष्ट्राऐवजी तामीळनाडू व आंध्रप्रदेशात गेली. दुसरी विस्ट्रॉन कंपनी कर्नाटकात गेली. महाराष्ट्रात ऍपलच्या एकाही कंपनीने गुंतवणूक केलेली नाही.

अकरा हजारांपैकी केवळ एकशे पंधरा लाेकांनीच स्विकारली नोकरी; असे का बरं घडले

विद्यार्थी रमले आनंददायी टिली-मिलीत; पाठ सुरू होताच पाटी अन्‌ दप्तर घेऊन बसतात टीव्हीसमोर! 

केंद्राने एक एप्रिलला इलेक्‍ट्रॉनिक्‍स गुंतवणुकीकरिता जाहीर केलेल्या पीएलआय योजनेंतर्गत ऍपल फोन बनविणाऱ्या तैवानच्या कॉन्ट्रक्‍ट मॅन्युफॅक्‍चरिंग कंपन्या भारतात गुंतवणुकीच्या विचारात आहेत. आता पेगॅट्रॉन ही कंपनी भारतात येण्याच्या विचारात आहे. त्यामुळे या कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. त्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिलेले आहे.
Edited By : Siddharth Latkar

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Congress Leader Prithviraj Chavan Writes Chief Minister Uddhav Thackreay To Bring Taiwans Company In Maharashtra