esakal | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांचा शासनाला विसर; तब्बल चार वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार' हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांचा शासनाला विसर; तब्बल चार वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही!

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांपासून अर्थात २०१७-१८ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराची घोषणा केली नाही. त्यामुळे शासनाला पुरस्काराचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार' हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडित, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या पुरस्काराचे नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार' असे होते. 

खंबाटकी घाटात अग्नितांडव; का झाला गाड्यांचा स्फोट?, वनक्षेत्रपाल सांगतात नेमकं कारण..

मात्र, गेल्या चार वर्षांपासून या पुरस्काराबाबत अद्याप कोणतीच घोषणा केली गेली नाही, त्यामुळे नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. युती सरकारच्या काळात एक-दोनवेळा या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. परंतु, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर याची पुनरावृत्ती होताना दिसत नाही आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थांना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण’ असे करण्यात आले आहे. या पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. 

चिंताजनक! साताऱ्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, या रुग्णालयांत शिल्लक आहेत बेड, व्हेंटिलेटर, ICU; जाणून घ्या नेमकी स्थिती..

राज्य शासनाच्यावतीने गेल्या ३० ते ४० वर्षांपासून मागासवर्गीय संस्था व मागासवर्गीय समाजाकरिता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देण्यात येत होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या पुरस्काराची घोषणाच झाली नाही. महाराष्ट्र शासनाने येत्या १४ एप्रिल अर्थात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराची घोषणा करावी व मागासवर्गीय समाजाला दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

रामदास आठवलेंच्या Go Corona, Corona Go..ला उदयनराजेंचे खास समर्थन; शरद पवारांच्या भेटीचेही उलगडले सत्य

पुरस्काराचे निकष व अटी

महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.

व्यक्तींसाठीचे निकष : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
-व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे.

संस्था : संस्थेत कोणताही गैरव्यवहार नसावा.
-संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आवश्यक.
-मागील ५ वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक.
या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात.
-या संस्था राजकारणापासून अलिप्त असाव्यात.

शिफारश पद्धती : या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.

-व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
-विना दुराचार प्रमाणपत्र
-गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
-सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
-संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल

पुरस्काराचे स्वरुप : पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.

एनबीसीसीच्या दिल्ली कार्यालयात सहाय्यक पदांसाठी मोठी भरती; SC, ST, OBC आणि दिव्यांगांना असणार विशेष प्राधान्य

आजपर्यंतचे पुरस्कार विजेते
१९९७-विठ्ठलराव साठे
२००९-प्रल्हाद लुलेकर
२०१२-दिलीपराव आगळे 
२०१७-१८-सिंधुताई सपकाळ

राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे.

  • डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे
  • यादव सीताराम तामगाडगे
  • केशव गोरोबा कांबळे
  • पंडित केरबा सूर्यवंशी
  • माजीद गफूरसाब मोमीन
  • भीमराव नागराव हत्तीअंबिरे
  • साहेबराव कामाजीराव कांबळे
  • सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर)
  • शंकर चन्नापा वीटकर
loading image
go to top